Crime
CrimeDainik Gomantak

मध्यप्रदेशात RTI कार्यकर्त्याची गोळ्या झाडून केली हत्या

मध्य प्रदेशात आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Published on

मध्य प्रदेशातील विदिशा शहरातील पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी एका आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रणजित सोनी यांची अज्ञात व्यक्तीने डोक्यात गोळी झाडून हत्या केली. रणजित हे मुखाजी नगर येथील रहिवासी असून ते कंत्राटदार, आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करत होते. सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडली.

Crime
सोने चोराला मध्यप्रदेश मधून अटक, गोवा पोलिसांची कामगिरी

दरम्यान, गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. सिव्हिल लाइनचे पोलिस डीएसपी समीर यादव आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. आरटीआय कार्यकर्ता असल्याने खुनाची शक्यता आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com