'प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे?' :RSS प्रमुख मोहन भागवत

देशातील मागील काही दिवसांपासून राजकारण मंदीर आणि मशिदीभोवती फेर धरत आहेत.
RSS chief Mohan Bhagwat
RSS chief Mohan BhagwatDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील मागील काही दिवसांपासून राजकारण मंदीर आणि मशिदीभोवती फेर धरत आहेत. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षांनी केल्यानंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं. त्याचवेळी या प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य आले आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे, असे त्यांनी म्हटले आहे.

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) म्हणाले की, ''आपण प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधत आहोत? आपल्याला कोणाला जिंकायचे नाही तर सर्वांना एकत्र जोडायचे आहे. मनात काही प्रश्न असतील तर ते उद्भवतात. ते कोणाच्या विरोधात नाहीत. मुस्लिमांनीही असे मानू नये आणि हिंदूंनीही असे मानू नये. असे काही असेल तर परस्पर संमतीने मार्ग काढा. संघ मंदिराबाबत कोणतेही आंदोलन करणार नाही.''

RSS chief Mohan Bhagwat
विवाहासाठी हिंदूंनी धर्मांतर करणे चूकीचे : मोहन भागवत

मोहन भागवत पुढे म्हणाले, “ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या गाजत आहे. असा इतिहास आहे, जो आपण बदलू शकत नाही. हे ना आजच्या हिंदूंनी (Hindu) बनवले होते ना आजच्या मुसलमानांनी. हे त्या वेळी घडले जेव्हा इस्लामिक आक्रमणकर्त्यांचा भारतात प्रवेश झाला. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे मनोधैर्य खचवण्यासाठी त्या हल्ल्यांमध्ये देवस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com