
Year Ender 2024: डिसेंबर हा या वर्षातील (2024) शेवटचा महिना आहे. अवघ्या काही दिवसांत 2024 वर्ष संपणार आहे. वर्ष बदलल्याने प्रवासाची आवड असलेले लोकही नवीन ठिकाणे शोधतात. अशा परिस्थितीत, भारतीय लोकांनी यावर्षी कोणती ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी Google वर चेक आउट केले हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. गुगलने एक यादी जारी केली आहे, ज्यामध्ये भारतीय लोकांनी सर्च केलेल्या टॉप 10 डेस्टिनेशनबद्दल सांगितले आहे. या 10 टॉप डेस्टिनेशनमध्ये दक्षिण गोवाही आहे. चला तर मग या टॉप 10 डेस्टिनेशनबद्दल जाणून घेऊया...
अझरबैजान देशाला ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. यावर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत भारतातून 1,40,000 पर्यटकांनी अझरबैजानला भेट दिली. वाढते पर्यटन पाहून थेट उड्डाणेही सुरु करण्यात आली, त्यामुळे युरोपातील आकर्षण आणि कनेक्टिव्हिटीमध्येही दिलासा मिळाला आहे.
बाली इंडोनेशियातील एक प्रसिद्ध शहर आहे. येथील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. याशिवाय, येथील प्राचीन मंदिरे आणि लोकप्रिय ठिकाणेही पर्यटकांना मोहिनी घालतात. बाली जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. बालीतील प्रमुख स्पॉट्स ठिकाणे सेमिन्यक आणि नुसा दुआ आहेत.
मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक शहर आहे, जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मॉल रोड ते रोहतांग व्हॅली इथली सर्वात लोकप्रिय ठिकाणे आहेत.
2023 मध्ये भारतातून 29,000 पर्यटकांनी कझाकिस्तान या देशाला भेट दिली, परंतु यावर्षी ही संख्या 49 टक्क्यांनी वाढली. कझाकिस्तानही एक व्हिसा मुक्त देश आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी गेले.
राजस्थानची राजधानी आणि गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर देखील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथील आमेर किल्ला, हवा महल आणि स्थानिक बाजारपेठ लोकांना भुरळ पाडते.
युरोपातील जॉर्जिया हा देश जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. इथलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मनमोहित करतं. यावर्षी सर्वाधिक भारतीय लोकांनी जॉर्जिया सर्च केले.
2024 मध्ये मलेशियातील पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्रकिनारे, निसर्ग लालित्यानं भारतीयांना मोहिनी घातली आहे.
अयोध्या (Ayodhya) ही श्री रामाची भूमी... हे शहर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. राम मंदिराच्या अभिषेकवेळीही यावर्षी अनेक विदेशी पर्यटक येथे पोहोचले होते.
पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाणारे काश्मीर हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. दरवर्षी बर्फवृष्टीनंतर देश-विदेशातील लोक गुलमर्गला भेट देण्यासाठी येतात.
दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. त्यातही खासकरुन दक्षिण गोव्यातील (South Goa) शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.