Goa Tourism: गोव्यातील 'पर्यटनावर' आम्ही समाधानी! विमान तिकिटदर वाढीवरती मंत्री खंवटेंचे दिलासादायक उत्तर

Rohan Khaunte: विमान तिकिटांचे दर वाढल्‍यामुळे गोव्‍याच्‍या पर्यटनावर विपरीत परिणाम होतील अशी भीती व्‍यक्त केली जात आहे. मात्र या गोष्‍टीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होणार नाही, असा विश्‍‍वास पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्‍यक्त केला आहे. त्‍यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
Goa Tourism Minister Rohan Khaunte
Goa Tourism Minister Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Rohan Khaunte About Air Ticket and Goa Tourism

पणजी: विमान तिकिटांचे दर वाढल्‍यामुळे गोव्‍याच्‍या पर्यटनावर विपरीत परिणाम होतील अशी भीती व्‍यक्त केली जात आहे. मात्र या गोष्‍टीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होणार नाही, असा विश्‍‍वास पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्‍यक्त केला आहे. त्‍यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

खंवटे म्हणाले की, गोवा हे खरोखरच एक नंदनवन आहे. विमान प्रवास फुल्ल आहे, हॉटेल्स फुल्ल आहेत. प्रामुख्याने सांगायचे झाले तर देशी पर्यटक अधिक येत आहेत. गोव्यातील पर्यटकांची संख्या आणि पर्यटन क्षेत्रातील सकारात्मक वाढीबद्दल आम्ही समाधानी आहोत.

Goa Tourism Minister Rohan Khaunte
Sunburn 2024: ‘सनबर्न’च्या 'एनओसी'ला खंडपीठामध्ये आव्हान! पंचायतीला परवान्याची प्रत सादर करण्याचे निर्देश

गोव्याचे नाव खराब करण्यापेक्षा गोव्याला योग्य प्रकारे जगासमोर सादर करणे गरजेचे आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.

पुरवठा आणि मागणी या दोन महत्त्‍वपूर्ण गोष्टी आहेत. पुरवठा जास्त असेल आणि मागणी कमी असेल तर किंमत कमी होते आणि पुरवठा कमी असेल व मागणी अधिक असेल तर किंमत वाढते. आज गोव्यात येणारी आणि जाणारी सर्व विमाने फुल्ल आहेत. याचाच अर्थ राज्यातील हॉटेल्‍स फुल्ल आहे असा होतो. व्‍यवसायावरही परिणाम

रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com