TN DGP C Sylinder Babu
TN DGP C Sylinder BabuDainik Gomantak

TN DGP Orders: वाढदिवस आणि Wedding Anniversary ला मिळणार पोलिसांना सुट्ट्या

तामिळनाडूमधील (Tamil Nadu) पोलीस (Police) कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय पोलीस महासंचालक (DGP) सी. सिलेंद्र बाबू (C Sylinder Babu) यांनी शुक्रवारी घेतला आहे.
Published on

तामिळनाडूमधील (Tamil Nadu) पोलीस (Police) कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय पोलीस महासंचालक (DGP) सी. सिलेंद्र बाबू (C Sylinder Babu) यांनी शुक्रवारी घेतला आहे. 30 जुलै पासून पोलिस कर्मचाऱ्यांना वाढदिवस (Birthday) आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या (Anniversaries) दिवशी सुट्टी देण्यात येणार आहे. यासंदर्भातील एका परिपत्रकात डीजीपींनी सुट्ट्या त्वरित लागू करण्याचे निर्देश दिले आहे. (TN DGP Orders: Birthday and Wedding Anniversary will get police leave)

हा निर्णय पोलीस अधिकाऱ्यांचे हित लक्षात घेऊन करण्यात आला आहे. “अनिवार्य साप्ताहिक सुट्टीमध्ये जर कर्मचारी काम करत असेल तर त्याला त्याचे वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा यासाठी वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देण्यात यावी,” असे परिपत्रकात म्हटले आहे.

TN DGP C Sylinder Babu
आयकर आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात नोकऱ्यांची संधी

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तामिळनाडू पोलिस विभागातील अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे उत्पादकता वाढेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन विकसित होईल. तमिलनाडू पोलिसांची ही बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे, कारण कोरोनाच्या गंभीर वातावरणात यापूर्वी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करतांना आपले प्राण गमावले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गृहमंत्रालयाच्या 2018 च्या अहवालानुसार भारतातील तामिळनाडूमध्ये पोलिस अधिकार्‍यांमध्ये आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण आहे, असे म्हटले आहे . एका अहवालानुसारमार्च 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या DTNEXT मध्ये, तामिळनाडूमध्ये एका आठवड्यात तब्बल 11 पोलिसांच्या मृत्यूची नोंद झाली, त्यापैकी सहा जणांनी आत्महत्या केली होत्या.

2018 मध्ये, तामिळनाडू सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS) सोबत मिळून पोलिस अधिकाऱ्यांसाठी स्ट्रेस-बस्टर प्रोग्राम सुरू केला. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ठराविक कालावधीत आयोजित केले जात आहे.

TN DGP C Sylinder Babu
Encounter: पुलवामा हल्ल्यात स्फोटकं बनवणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com