Encounter: पुलवामा हल्ल्यात स्फोटकं बनवणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान

Pulwama: 27 जून रोजी जम्मू -काश्मीर पोलिसांनी सुंजवानमधील नरवालजवळून शस्त्र, दारूगोळा आणि पाच किलो स्फोटकांसह (IED) एका दहशतवाद्याला अटक केल्याने मोठा कट उधळला गेला होता.
Two terrorist killed in pulwama
Two terrorist killed in pulwamaDainik Gomantak
Published on
Updated on

पुलवामामध्ये दुसरीकडे जैश-ए-मोहोम्मदच्या दोन अतिरेक्यांना ठार करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आल्याचे समजते आहे. ठार झालेल्यांपैकी लंबू ढेर हा पुलवामा हल्ल्याचा सुत्रधार मसुद अजहरचा निकटवर्तीय समजला जात होता. तर सुरक्षा दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) पथकांनी जम्मू -काश्मीरमध्ये सुमारे 14 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. जम्मूतील शोपियां, अनंतनाग, बनिहाल, सुंजवान आणि काश्मीरच्या इतर भागात पोहोचलेल्या तपास यंत्रणेच्या पथकांनी घरं, कार्यालयं इत्यादींची तपासणी सुरू केली आहे. वेगवेगळ्या दोन प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचे समजते आहे. सुरक्षा दलाने 27 जून रोजी जम्मूमध्ये पाच किलो स्फोटक (IED) जप्त केले आणि कुशवानी परिसरातून लष्कर-ए-मुस्तफाचा अतिरेकी हिदायतुल्लाह मलिकला अटक केली होती. (Pulwama Encounter: Two terrorist killed in pulwama)

एनआयएकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर छापे टाकले जात असल्याने, तपास यंत्रणांना या दोन्ही प्रकरणांमध्ये खूप महत्वाची माहिती मिळाली असावी अशी शक्यता असुन, त्याच आधारावर हे छापे टाकण्यात आले असल्याची शक्यता आहे. एनआयएने या संदर्भात कोणतीही माहिती माहिती देण्यास नकार दिला आहे. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते याबद्दल सांगू शकतील, असे एनआयएचे म्हणणे आहे.

Two terrorist killed in pulwama
लद्दाख संघर्षानंतर भारत चीन चर्चेसाठी पुन्हा एकत्र

27 जून रोजी जम्मू -काश्मीर पोलिसांनी सुंजवानमधील नरवालजवळून शस्त्र, दारूगोळा आणि पाच किलो आयईडीसह एका दहशतवाद्याला अटक केली होती. योग्य वेळी झालेली अटक आणि सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे जम्मू शहरातील दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळला गेला.

दरम्यान, एनआयएच्या टीमने 22 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया केल्याबद्दल नुकत्याच स्थापन झालेल्या लष्कर-ए-मुस्तफा (LEM) च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. लष्कर-ए-मुस्तफाची स्थापना जम्मूमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती, जी जैश-ए-मोहम्मद या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com