UPSC-2015 बॅच ची टॉपर 13 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या IAS अधिकाऱ्याशी करणार लग्न

UPSC-2015 बॅच ची टॉपर टीना दाबी (Tina Dabi) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Pradeep Gawande & Tina Dabi
Pradeep Gawande & Tina DabiDainik Gomantak
Published on
Updated on

UPSC-2015 बॅच ची टॉपर टीना दाबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजस्थानच्या वित्त विभागात जॉइंट सेक्रेटरी असलेली टीना दाबी (Tina Dabi) वयाच्या 28 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. राजस्थानमधील आयएएस प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांच्याबरोबर लग्न करणार आहे. गावंडे हे सध्या राजस्थानच्या (Rajasthan) पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागात संचालक आहेत. सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असलेल्या टीनाने तिच्या नव्या जोडीदारासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. गेल्या वर्षी टीनाने अतहर आमिरपासून (Athar Aamir) घटस्फोट घेतला होता. अतहर हे टीना दाबीच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

पोस्टमध्ये लिहिले- 'तुम्ही देत असलेली स्माईल मी धारण केली आहे'

आयएएस टीना दाबीने प्रदीप गावंडे यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना लिहिले की, 'तुम्ही देत असलेली स्माईल मी धारण केले आहे'. यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. दाबी आणि गावंडे एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 22 एप्रिलला ते जयपूरमधील हॉटेलमध्ये रिसेप्शनही देणार आहेत.

Pradeep Gawande & Tina Dabi
दिल्लीत झाडांच्या उपचारासाठी 'ट्री अ‍ॅम्ब्युलन्स' सुरू

गेल्या वर्षी घटस्फोट झाला

टीना दाबीने यापूर्वी 2018 मध्ये तिच्याच बॅचमधील आयएएस अधिकारी अतहर अमीरशी लग्न केले होते. तथापि, टीना आणि अतहर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करुन एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर न्यायालयाने ऑगस्ट 2021 मध्ये घटस्फोट मंजूर केला.

14 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स

2015 च्या यूपीएससी परिक्षेत टॉपमध्ये आल्यानंतर टिना दाबी चर्चेत आली होती. यानंतर, तिच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रेरणादायी पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. सध्या तिच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या 1.4 दशलक्षांवर पोहोचली. टीनाचा जन्म भोपाळ (Madhya Pradesh) येथे झाला. मात्र, तिचे कुटुंब मूळचे जयपूरचे आहे.

Pradeep Gawande & Tina Dabi
VIDEO: बिहार सरकारने 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाची तिकीटे वाटली मोफत!

गावंडे यांचे नाव लाचखोरी प्रकरणात आले, सध्या तपास प्रलंबित

सप्टेंबर 2021 मध्ये, ACB ने RSLDC (Rajasthan Skills and Livelihood Development Corporation) मधील योजना समन्वयक अशोक सांगवान आणि व्यवस्थापक राहुल कुमार गर्ग यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. दोन्ही आरोपींनी लाचेची रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्याची चर्चाही रंगली होती. प्रशिक्षणासाठी आणि फर्मला ब्लॅक यादीतून काढून टाकण्यासाठी आणि 1.25 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी बिल पास करण्याच्या बदल्यात 10 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार खासगी फर्मने एसीबीकडे केली होती. नंतर हा सौदा 5 लाखात ठरला आणि एसीबीने दोन्ही आरोपींना 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात आयएएस नीरज पवनसह आरएसएलडीसीचे तत्कालीन एमडी गावंडे यांनाही आरोपी करण्यात आले होते. सध्या या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यात आले असून, गावंडे आणि नीरज पवन यांच्याविरुद्ध तपास प्रलंबित आहे.

गावंडे एमबीबीएस केल्यानंतर 2013 मध्ये आयएएस झाले

मुळात डॉ. प्रदीप गावंडे हे महाराष्ट्रातील आहेत. एमबीबीएस केल्यानंतर ते आयएएस झाले. गावंडे, 2013 च्या बॅचचे राजस्थान केडरचे IAS अधिकारी आहेत. बुंदीमध्ये त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण कालावधीत 2015 मध्ये रासायनिक खते मंत्रालयात सहाय्यक सचिव आणि ढोलपूरमध्ये SDM म्हणून काम केले. नोव्हेंबर 2016 ते मे 2018 पर्यंत ते जोधपूर जिल्हा परिषदेचे CEO राहिले. एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत बिकानेर नगरपरिषदेचे CEO आहेत. 2 जुलै 2020 ते 6 जानेवारी 2021 पर्यंत ते चुरुचे जिल्हाधिकारी देखील होते. यानंतर त्यांनी 4 जानेवारी 2021 ते ऑक्टोबर या कालावधीत RSLDC चे MD म्हणून काम केले. लाचखोरी प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांची पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली. तेव्हापासून त्याच पोस्टवर कायम आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com