VIDEO: बिहार सरकारने 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाची तिकीटे वाटली मोफत!

बिहार विधानसभेच्या सदस्यांना सोमवारी 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची तिकीटे मोफत वाटण्यात आली.
Bihar Legislative Assembly
Bihar Legislative Assembly Dainik Gomantak

'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावरुन देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर बिहार विधानसभेच्या सदस्यांना सोमवारी 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची तिकीटे मोफत वाटण्यात आली. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी ही तिकिटे सदस्यांना उपलब्ध करुन दिली होती. मात्र बहुतांश विरोधी सदस्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोध दर्शवत तिकिटे फाडली. चित्रपटाला जाणीवपूर्वक राजकारणाचा मुद्दा बनवला जात असल्याचे विरोधी पक्षातील सदस्यांनी म्हटले आहे. 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनावर विरोधी पक्षातील सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने चित्रपटाबाबत बिहार (Bihar) विधानसभेच्या सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद दिसून आले. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित हा चित्रपट काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या पलायनावर केंद्रित आहे. मोफत तिकीटांचे वाटप करुन राज्य सरकार भाजपच्या कथित अजेंड्याला चालना देत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे. (Bihar government has provided free The Kashmir Files Movie tickets to members of the Legislative Assembly)

दरम्यान, उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी सभागृहात सांगितले की, ''सर्व आमदारांसाठी चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला आहे, त्यानंतर त्यांना चित्रपटाची तिकिटे वाटण्यात आली.'' सभागृहात झिरो अवर सुरु होताच विरोधी सदस्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) सदस्यांनीही सीपीआय (CMl) सदस्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु केली. व्यासपीठासमोर येऊन सदस्यांनी तिकीटं फाडली. त्यावर सभापती विजयकुमार सिन्हा यांनी नाराजी व्यक्त करत सदस्यांना सभागृहाच्या गौरवशाली वारशाचा आदर करण्यास सांगितले. दुसरीकडे, दुपारी एक वाजता होणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या सुट्टीच्या सुमारे अर्धा तास आधी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Bihar Legislative Assembly
सोनियांशी झाली चर्चा, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर काँग्रेससोबत?

तसेच, सभागृहाबाहेर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. सीपीआय (CMl) आमदार अजित कुशवाह म्हणाले, "भाजपचा जातीयवादी अजेंडा पुढे नेण्याचा सरकारचा हा चतुर प्रयत्न आहे. सर्व प्रकारच्या समस्यांवर यापूर्वी अनेक चित्रपट बनले आहेत. पण याआधी सरकारने चित्रपटाच्या अशाप्रकारे प्रमोशन करण्याचा प्रयत्न कधीच पाहिला नव्हता.” ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुलडोजर बाबा’ असे टोपणनाव मिळालेल्या यूपी निवडणुकीत भाजपने विजय संपादन केला. आता सरकारला बिहारच्या गरिब जनतेवर योगींचा बुलडोझर चालवायचा आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही.” ते पुढे म्हणाले की, 'उद्या आम्ही केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या जातीय भावना भडकवण्याच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणू.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com