दिल्लीत झाडांच्या उपचारासाठी 'ट्री अ‍ॅम्ब्युलन्स' सुरू

झाडांच्या रूग्णवाहिकेत हायड्रोलिक लिफ्टही बसवण्यात आली आहे.
Tree Ambulance
Tree Ambulance Dainik Gomantak
Published on
Updated on

पूर्व दिल्ली महानगरपालिकेने आजारी आणि कमकुवत झाडांच्या उपचारासाठी एक नवीन योजना आखली आहे. पूर्व दिल्ली महानगरपालिकेने आजारी आणि कमकुवत झाडांवर उपचार करण्यासाठी वृक्ष रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे.

Tree Ambulance
काश्मिरी पंडितांना चित्रपटाची नव्हे तर पुनर्वसनाची गरज आहे: केजरीवाल

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. झाडांच्या (Trees) रूग्णवाहिकेच्या आत हायड्रोलिक लिफ्टही बसवण्यात आली आहे, जेणेकरून उंचीवर जाऊन झाडांवर उपचार करता येतील.

पूर्व दिल्ली (Delhi) महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे संचालक राघवेंद्र सिंह यांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही 'ट्री अ‍ॅम्ब्युलन्स' सुरू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे. 155303 या क्रमांकावर संपर्क करून लोक त्यांच्या आजूबाजूच्या आजारी झाडांची माहिती महामंडळाला देऊ शकतात. त्यानंतर झाडांच्या स्थितीची पाहणी केल्यानंतर पथक त्यावर उपचार करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com