अशी जाऊ शकतात मुरगावसह देशातील ही 12 शहरे पाण्याखाली

गोव्यातील मुरगावसह भारतातील एकूण 12 शहरे पाण्याखाली जातील, मंगळुरू शहराला सर्वाधिक धोका
भारतातील 12 शहरे पाण्याखाली
भारतातील 12 शहरे पाण्याखालीDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील (Goa) मुरगाव (Murgaon) (vasco) शहरासह भारतातील एकूण 12 शहरे सन 2100 पर्यंत 2.7 फूट खोल पाण्याखाली जातील, असे भाकीत अमेरिकेच्या नासा या संस्थेने केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरसरकार समितीने (IPCC) वातावरण बदलांविषयी तयार केलेल्या अहवालाच्या आधारे माहितीचे पृथक्करण करीत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (This is how these 12 cities of country including Murgaon can go underwater)

पाण्याखाली जाण्याची शक्यता असलेली ही शहरे बंदरांशी संलग्न आहेत, पण गोव्यासारख्या लहान प्रदेशात मुरगाव बंदर आणि पणजी दरम्यानचे एकूण अंतर तसेच दोन्ही शहरांची समुद्रसपाटीपासूनची उंची लक्षात घेता पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुरगावइतकाच पणजीलाही धोका संभवतो.

भारतातील 12 शहरे पाण्याखाली
Global Warming: हवामान बदलाचे नवे धोके; जगातील काही शहरं झाली हॉटस्पॉट
गोव्यातील मुरगाव शहरासह भारतातील एकूण 12 शहरे पाण्याखाली
गोव्यातील मुरगाव शहरासह भारतातील एकूण 12 शहरे पाण्याखालीDainik Gomantak

या विषयावर प्रसिद्ध पर्यावरणवादी क्लॉड आल्वारीस म्हणाले, पूर्वीच्या किनारपट्टी विभाग व्यवस्थापन योजनेत धोक्याची रेषा अधोरेखित करण्याची तरतूद होती व ती पणजी शहराच्या मधोमध जात होती. याचा अर्थ पणजीबरोबरच म्हापसापर्यंत पाणी घुसणार आहे. समुद्र पातळीवाढीचा इशारा शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून देत असले तरी हा धोका आता सत्यात उतरत असल्याबाबत संशोधकांचे एकमत झाले आहे आणि पुढच्या 50 वर्षात पणजीचे ‘चार खांब’ पर्यंतचे भाग पाण्याखाली बुडणार आहेत, अशी माहिती आल्वारीस यांनी ‘गोमन्तक’ला दिली. ते पुढे म्हणाले, किनारपट्टी नियमन योजनेत सुरवातीला 2011 मध्ये ही धोक्याची रेषा नमूद करण्याची सूचना होती, जी 2018 मध्ये काढून टाकण्यात आली, बांधकामांसाठी यापुढे खबरदारी घेतली जावी, अशी ती सुरवातीची संकल्पना होती, जी विकासाच्या नावाखाली अंतर्धान पावली.

भारतातील 12 शहरे पाण्याखाली
Monsoon: देशातील 'या' राज्यांत पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

मंगळुरू शहराला सर्वाधिक धोका

शहरांपैकी कर्नाटकातील मंगळुरू शहराला सर्वाधिक धोका असून तेच सर्वप्रथम पाण्याखाली जाईल, असे नासाचा अहवाल सांगतो. अंटार्क्टिकातील हिमाच्छदनापासून विघटित होऊन वितळणाऱ्या हिमनगांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने या शहरांना पाण्याखाली जावे लागेल.

धोक्याच्या रेषा...

धोक्याच्या छायेत आलेल्या देशातील अन्य शहरांत कांडला, ओखला, भावनगर, मुंबई, मंगळूरू, कोचीन, पारादीप, खिदिरपूर, विशाखापट्टण, चेन्नई आणि तुतिकोरीन या बंदर शहरांचा समावेश आहे. नासाच्या अहवालात न्यूयाॅर्क, कोलंबो अशा शहरांच्या बाबतीतही हेच भविष्य वर्तवण्यात आले आहे.

"शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा देऊनही विकासाचा जुनाच नमुना आमची सरकारे देऊ लागली आहेत. मानवी जीव धोक्यात टाकू लागली आहे. दुर्दैवाने पणजीच्या विधानसभा निवडणुकीत तरी हा मुद्दा बनू शकेल काय, मला शंकाच आहे."

- क्लाॅड अल्वारीस, गोवा फाऊंडेशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com