Monsoon: देशातील 'या' राज्यांत पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पाऊसचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, तर पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, आणि तामिळनाडूच्या काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.Dainik Gomantak

नवी दिल्ली: देशाच्या बहुतांश भागात पाऊस (rain) मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या उप-हिमालयीन प्रदेशात कमी दाबाचा पट्टा पर्वतांच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे तेथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Chance of heavy rain) आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मेघालयच्या बहुतेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, बिहार, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, केरळ, आणि अरुणाचल प्रदेशच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Monsoon: महाराष्ट्रात आणखीन आठवडाभर पावसाचा ब्रेक

हिमालयच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा सरकत असल्याने, उत्तर भारताच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर भागात मध्यम पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या दक्षिण-पश्चिमी वाऱ्यांमुळे 11 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी देशातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील चार-पाच दिवसांमध्ये उत्तराखंडच्या गंगा प्रदेश, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Monsoon: दिल्लीला 'ऑरेंज अलर्ट' तर मध्य प्रदेशात पुढील 5 दिवस मुसळधार

पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुलनेत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पाऊसचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, तर पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, आणि तामिळनाडूच्या काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com