Global Warming: हवामान बदलाचे नवे धोके; जगातील काही शहरं झाली हॉटस्पॉट

Climate Change: अभ्यासाअंतर्गत, शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील हवामान आणि जगभरातील परिसंस्थांचे मूल्यांकन केले आहे.
Global Warming: ipcc report highlights new threats to climate change
Global Warming: ipcc report highlights new threats to climate changeDainik Gomantak
Published on
Updated on

मागच्या काही दिवसांपासुन जगभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनलेल्या ग्लोबल वॉर्मींगच्या (Global Warming) मुद्दयांशी संबंधीत आणखी एक धक्कादायत अहवाल समोर आला आहे. युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल क्लायमेट चेंज पॅनेलने अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालात (The Intergovernmental Panel on Climate Change ) या विषयावरची नवी माहिती समोर आली आहे. या अहवालात सादर केलेल्या माहितीनुसार आहे की, जगातील काही शहरे ग्लोबल वॉर्मिंगचे हॉटस्पॉट बनली आहेत, कारण वातावरण थंड ठेवण्यासाठी आवश्यक असलेले पाण्याचे स्त्रोत आणि वनस्पती दिवसेंदीवस कमी होत जाता आहेत. या अहवालात असेही म्हटले आहे की, जागतिक समुद्र पातळी 1901 ते 2018 दरम्यान सरासरी 0.20 मीटरने वाढली आहे.

युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने सोमवारी आपला सहावा मूल्यांकन अहवाल जाहीर केला. भारतही या पॅनेलचा एक भाग आहे. या अभ्यासाअंतर्गत, शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील हवामान आणि जगभरातील परिसंस्थांचे मूल्यांकन केले आहे. यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भविष्यात हवामान बदलाचे जे धोके अपेक्षित होते ते त्याआधीच येऊ शकतात. ज्याचा सामना करणे कठीण झाले आहे. त्यातील एक महत्वाचे उदाहरण म्हणजे समुद्राची वाढती पातळी सामान्य पातळीवर आणण्यासाठी कदाचित शेकडो किंवा हजारो वर्षे लागु शकतात. अशीच परिस्थीती इतर बाबतीतही आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचे धक्कादायक परिणाम

1. पृथ्वीवरचे तापमान वेगाने वाढते आहे. या अहवालानुसार 2030 पर्यंत पृथ्वीचे तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल. जे पूर्वीच्या अंदाजापेक्षा दहा वर्षे लवकर होणर असुन, हा सर्वात मोठा धोका आहे.

2. समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. 1901 ते 1971 दरम्यान दरवर्षी सरासरी 1.3 वाढत होते. 2006 ते 2018 दरम्यान ते दरवर्षी 3.7 मिमी पर्यंत वाढले आहे. 1901 ते 2018 दरम्यान जागतिक पाण्याच्या पातळीत 0.15 ते 0.25 मीटर वाढ झाली आहे.

Global Warming: ipcc report highlights new threats to climate change
मंगळाचा प्रवास करायचा आहे? नासा देत आहे विशेष संधी; कोण अर्ज करू शकतो?

3. अहवालानुसार, उष्णतेची लाट आणि त्याचा वेळ पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. 1950 पासून, जगातील बहुतेक भागांमध्ये दरवर्षी उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. थंडीचा कडाका दिवसेंदिवस कमी होत जातोय. मानवाने निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे हवामान बदल हे ग्लोबल वॉर्मिंगच्या या धोकादायक परिणामांचे मुख्य कारण आहे. जर हे त्वरित नियंत्रित केले गेले नाही, तर पुन्हा त्याला पुर्वपदावर आणणे अशक्य होईल.

5. जगातील काही शहरे ग्लोबल वॉर्मिंगचे नवीन हॉटस्पॉट बनली आहेत. पाणी आणि वनस्पतींच्या अभावामुळे उष्णतेची पातळी वाढते आहे.

6. पहिल्या 10 किंवा 50 वर्षात झालेल्या तीव्र उष्णता, आपत्तीजनक पाऊस किंवा दुष्काळाच्या घटना आता फारच कमी कालावधीनंतर पुन्हा पुन्हा समोर येता आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हाणी होताना दिसुन येते आहे.

Global Warming: ipcc report highlights new threats to climate change
Saudi Arabia लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच उमरा यात्रेसाठी देणार परवानगी

7. हवामान बदलांची तीव्रता सध्या वाढली आहे. दोन किंवा अधिक नैसर्गिक आपत्तींचा उद्रेक एकाच वेळी दिसू लागला आहे. उष्णतेची लाट आणि दुष्काळाच्या घटना एकाच वेळी घडताना दिसता आहे.

8. हवामान बदल तज्ञ म्हणतात की, अनपेक्षित नैसर्गिक आपत्ती किंवा ग्लोबल वार्मिंग घटनेसाठी विशिष्ट गोष्टीला जबाबदार धरणे कठीण आहे. परंतु आता मानवाने केलेल्या फेरबदलांचा परिणाम आणि तीव्रता अधिक चांगल्या प्रकारे नोंदवली जाऊ शकते, जेणेकरून अत्यंत गंभीर आपत्तींची शक्यता आणि वेळेचा अंदाज लावता येणार आहे.

9. अहवालानुसार, हवामान बदल आणि जीवनमान एकमेकांशी संबंधित आहेत. समस्या सोडवल्याने आपोआप राहणीमान आणि आर्थिक वाढ सुधारेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com