'काँग्रेसला मतदान करण्यात अर्थ नाही', गुजरातमध्ये केजरीवालांचा काँग्रेसवर हल्लाबोल

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मते देऊन आपली मते वाया घालवू नका
Arvind Kejriwal in Gujarat
Arvind Kejriwal in GujaratDainik Gomantak

अहमदाबाद: आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी लोकांना आवाहन केले. 'आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मते देऊन आपली मते वाया घालवू नका आणि देशातील सर्वात जुन्या पक्षाला एकही मत मिळणार नाही याची काळजी घ्या,' असे केजरीवाल म्हणाले. भाजपवर नाराज असलेल्या, काँग्रेसला मत देऊ इच्छिणाऱ्या सर्वांची मते मिळाल्यास गुजरातमध्ये आप पुढील सरकार बनवू शकते.

अहमदाबादमध्ये सुमारे 7,000 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, 'गुजरातमध्ये काँग्रेस केवळ कागदावरच अस्तित्वात आहे, तर 'आप'ची संघटना मुख्य विरोधी पक्षापेक्षा कितीतरी पटीने मोठी झाली आहे आणि अल्पावधीतच लाखो लोकांशी जोडली गेली आहे.'

Arvind Kejriwal in Gujarat
उदयपूर, अमरावती नंतर अयोध्येत हनुमान मंदिर परिसरात गळा कापून तरूणाची हत्या

AAP पेक्षा खूप मोठा पक्ष

केजरीवाल यांनी दावा केला की, गुजरातमधील भाजपचे एक शिष्टमंडळ, जे नुकतेच दिल्लीला गेले होते. तेथे त्यांना शाळा आणि रुग्णालयांमध्ये एकही कमतरता आढळून आली नाही. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना गुजरातमधील मतदारांना त्यांची मते मागताना दिल्ली आणि पंजाबमधील आप सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यास सांगितले. केजरीवाल म्हणाले, 'मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की आज अनेक वर्षे गुजरातवर राज्य करणाऱ्या काँग्रेसपेक्षा 'आप'ची संघटना खूप मोठी आहे. काँग्रेस केवळ कागदावरच मर्यादित आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते नसलेला हा पक्ष असून लाखो लोक 'आप'मध्ये सामील होत आहेत.'

काँग्रेसला मतदान करण्यात काही अर्थ नाही

महिनाभरात बूथ लेव्हल संघटना स्थापन केल्यानंतर गुजरातमध्ये भाजपपेक्षा 'आप'चे संघटन मोठे होईल, असा दावा केजरीवाल यांनी केला. 'भाजप लोकांना मतासाठी पैसे देतात. आपचे कार्यकर्ते पैशासाठी आले नाहीत ते निष्ठावान आहेत. मतदारांना सांगा, काँग्रेसला मतदान करण्यात अर्थ नाही. मागच्या वेळी लोकांनी मोठ्या अपेक्षेने काँग्रेसला मतदान केले होते, मात्र आत्तापर्यंत (Gujarat) 57 आमदारांनी पक्ष सोडला आहे. काँग्रेसला पाठिंबा देऊन मत वाया घालवू नका. आगामी निवडणुकीत काँग्रेसला एकही मत मिळणार नाही याची काळजी घ्या,असे केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal in Gujarat
चीन अन् दक्षिण कोरियाच्या विमानांना मागे टाकत भारतीय लढाऊ विमानावर मलेशियाचा विश्वास

भाजपवर नाराज असलेल्या काँग्रेसला मत द्यायचे नसेल, तर आम्हाला द्या,

'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या राजवटीवर नाराज असलेल्या लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करावा, मात्र काँग्रेसला मतदान करायचे नाही, असेही सुचवा. पर्याय नसल्याने ते भाजपला मतदान करतात जर तुम्ही त्यांना 'आप'ला मत द्यायला लावलं तर गुजरातमध्ये पुढचं सरकार बनवण्यापासून कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही, विरोधी पक्ष गुजरातमध्ये प्रचार करत नाही तर भाजप "आप'ला दडपण्याचा एकमेव अजेंडा पाळत आहे, असे काँग्रेसची खिल्ली उडवत केजरीवाल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com