उदयपूर, अमरावती नंतर अयोध्येत हनुमान मंदिर परिसरात गळा कापून तरूणाची हत्या

मृत तरुण हा यूपीतील अमेठीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून तो कधी कधी मंदिरात झोपायला यायचा.
Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Ayodhya Murder Case: अयोध्येतील भूयापूर गावात हनुमान मंदिर परिसरात एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. एका व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुण हा यूपीतील अमेठीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून तो कधी कधी मंदिरात झोपायला यायचा. दरम्यान, गळा चिरून निर्घृण हत्या केल्याच्या घटना देशातील दोन वेगवेगळ्या राज्यांतून समोर आल्या आहेत. महाराष्ट्र आणइ राजस्थानमध्ये यापुर्वी असे प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

Crime
Amravati Murder Case: अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड गजाआड

आरोपींना अटक, कुऱ्हाडही जप्त

या प्रकरणाची माहिती देताना अयोध्येतील मिलकपूरचे मंडळ अधिकारी सत्येंद्र भूषण यांनी सांगितले की, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी अयोध्येचे एसएसपी एस पांडे यांनी सांगितले की, कुमारगंज पोलिस स्टेशन हद्दीतील एका मंदिर परिसरात 35 वर्षीय पंकज शुक्लाचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणाचा मंदिराशी संबंध नसल्याचे पांडे यांनी सांगितले. हत्येच्या आदल्या रात्री हल्ल्याची माहिती मिळाल्यावर, मृत पंकजचा चुलत भाऊ गुल्लू मिश्रा याला अटक करण्यात आली असून खुनाचे हत्यार आणि कुऱ्हाडही जप्त करण्यात आल्याची माहिती, पांडे यांनी दिली.

हनुमान मंदिराच्या ओट्यावर कापला गळा

अयोध्येत तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची बातमी समजताच सर्वत्र खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. असे सांगितले जात आहे की, मृत पंकज हा जवळपास 2 महिन्यांपासून आपल्या मामाच्या घरी राहत होता आणि रात्रीचे जेवण करून वीज नसल्याने तो घराबाहेर हनुमान मंदिराच्या ओट्यावर झोपायला गेला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पंकजचा मृतदेह घराबाहेर पडल्याचे दिसून आले.

Crime
उदयपूर हत्याकांडातील दोषींना फाशी द्या, मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केली मागणी

दोन राज्यांतून गळा चिरण्याच्या घटना समोर आल्या आहेत

नुकतेच राजस्थानमधील उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावती येथून गळा चिरण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये, भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवरून उदयपूरमधील शिंपी कन्हैयालाल आणि अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. मात्र, सध्यातरी अयोध्येतील गळा चिरण्याचे प्रकरण हे परस्पर वादाचे प्रकरण असल्याचे यूपी पोलिसांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com