Mobile Price: बजेटपूर्वीच मोदी सरकारची भेट, या निर्णयामुळे कमी होणार मोबाईलच्या किमती

Custom Duty: कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने मोबाईल फोन्सच्या उत्पादनाची किंमत कमी होईल, ज्याचा फायदा एन्ड यूजर म्हणजेच सर्वसामान्यांना होऊ शकतो.
Custom Duty|Production Of Mobile Phones
Custom Duty|Production Of Mobile PhonesDainik Gomantak
Published on
Updated on

The reduction in custom duty will reduce the cost of production of mobile phones, which can benefit the end user:

मोदी सरकारने अर्थसंकल्पापूर्वी मोबाईल यूजर्सना खुशखबर दिली आहे. मोदी सरकारने मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुख्य घटकांवरील आयात शुल्क कमी केले आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक भागांवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे.

कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने मोबाईल फोन्सच्या उत्पादनाची किंमत कमी होईल, ज्याचा फायदा एन्ड यूजर म्हणजेच सर्वसामान्यांना होऊ शकतो.

केंद्र सरकारने मोबाईल फोनच्या घटकांवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के केले आहे. केंद्रीय आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "कस्टम ड्युटी कमी केल्याने उद्योग आणि सीमाशुल्क प्रक्रियेत अत्यंत आवश्यक निश्चितता आणि स्पष्टता येते. मोबाईल फोन उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने या निर्णयासाठी मी माननीय पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानतो. मंत्री."

Custom Duty|Production Of Mobile Phones
Budget मधील घोषणा समजण्यासाठी जाणून घ्या, अर्थसंकल्पाशी संबंधित अवघड शब्दांचे अर्थ

मोबाईल फोनच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवरील कस्टम ड्युटी तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. काही घटकांवरील आयात शुल्क किंवा अन्य शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय, पूर्वी “इतर” श्रेणीमध्ये ठेवलेल्या घटकांवरील कस्टम ड्युटी देखील 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही घटकांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे.

Custom Duty|Production Of Mobile Phones
पेटीएमवर आरबीआयची मोठी कारवाई; नवीन ग्राहक जोडण्यावर घातली बंदी!

सरकारने बजेट कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्यामुळे मोबाईल उत्पादक कंपन्यांना आता पूर्वीपेक्षा कमी आयात शुल्क भरावे लागणार आहे. त्याचा फायदा सामान्य वापरकर्त्यांनाही मिळू शकतो. तथापि, फोनची किंमत कमी करणे पूर्णपणे तो बनवणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे.

या घटकांवर कस्टम ड्युटी कमी

बॅटरी कव्हर

फ्रंट कव्हर

मेन लेन्स

बॅक कव्हर

GSM अँटेना

PU केस

सीलिंग गॅस्केट

सिम सॉकेट

स्क्रू

प्लास्टिक आणि धातूपासून बनवलेल्या इतर यांत्रिक वस्तू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com