Pernem Fuel Project : पेडणेत प्लास्टिक कचऱ्यातून इंधन निर्मिती प्रकल्प; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Pernem Fuel Project : उद्या उद्‌घाटन ः ७ वर्षे रखडलेले काम अखेर पूर्ण
Pernem Fuel Project
Pernem Fuel ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Pernem Fuel Project : पेडणे, सात वर्षे काम रखडलेल्या गोवा राज्य नागरी विकास संस्था व पेडणे नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ता.१५ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वा. प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित ​​राणे, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर ,उपनगराध्यक्ष अश्विनी पालयेकर ,महापालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर,मुख्याधिकारी अनंत मळिक उपस्थित असतील.

१६ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प एमके ॲरोमॅटिक्स लिमिटेडने बांधला आहे.तत्कालीन नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर यांच्या कालावधीत प्रकल्पाच्या कामालाही सुरवात झाली होती. दरम्यान, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेद्र आर्लेकर पराभूत झाले आणि प्रकल्पाचे कामही रखडले.

त्यानंतर पेडण्याचे तत्कालीन आमदार बाबू आजगावकर यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर या प्रकल्पाला पुन्हा वेग आला आणि नंतर परत काम रखडले व सात वर्षानंतर हळूहळू या प्रकल्पाचे काम सुरू होऊन या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.

Pernem Fuel Project
Vasco News - आमदार साळकर यांनी बायणा पॉवर हाऊस प्रकल्पाची केली पाहणी | Gomantak TV

२०१० पासूनचा प्रकल्प अखेर मार्गी

पालिका क्षेत्राबरोबरच तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कचरा समस्या सोडविण्यासाठी २०१० च्या सुमारास येथील आयटीआय केंद्रापासून काही अंतरावर कचरा प्रकल्पासाठी यंत्र सामुग्री बसविली.खर्च केलेले कोट्यवधी रुपये कचऱ्यात गेले.

त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन पंचायत मंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रयत्नाने ‘सुडा’ योजनेअंतर्गत १६ कोटींचा प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पाचे याच फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते पायाभरणी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com