सुरक्षेच्या कारणास्तव माहिती प्रसारण मंत्रालयाने घातली 'या' वृत्तवाहिनीवर बंदी

जमात-ए-इस्लामीचे नियंत्रण असलेली ही वाहिनी सोमवारी दुपारी बंद करण्यात आली.
Media One TV
Media One TVDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी "सुरक्षेच्या कारणास्तव" 'मीडिया वन' या मल्याळम वृत्तवाहिनी चे प्रसारणास स्थगिती दिली आहे. जमात-ए-इस्लामीचे नियंत्रण असलेली ही वाहिनी सोमवारी दुपारी बंद करण्यात आली. मीडिया वन Media One TV चे संपादक प्रमोद रमण यांनी दुपारी मंत्रालयाच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी एका टीव्ही चॅनलवर सांगितले की त्यांची कायदेशीर टीम याबद्दल अधिक माहिती घेत आहे.

Media One TV
कपिल शर्मानं सांगितला मनमोहन सिंगांचा 'रेवडी' किस्सा

विरोधकांचा सरकारवर निशाणा

ते म्हणाले, “सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. आम्हाला अजून यासंदर्भात तपशील मिळालेला नाही. मात्र आम्हाला आशा आहे की, न्याय मिळेल आणि आम्ही लवकरच आमचे प्रसारण सुरू करू शकू.” अनेक पत्रकार (Journalist) संघटना आणि विरोधी पक्ष काँग्रेसने (Congress) या कारवाईचा निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन म्हणाले की, “हे एक अलोकतांत्रिक पाऊल आहे. वाहिनीचे प्रसारण स्थगित केले मात्र असे करण्यामागचे कारण अस्पष्ट आहे. हे सविधानाने दिलेल्या न्यायाचे उल्लंघन आहे. सर्व लोकशाही शक्तींनी याचा निषेध केला पाहिजे."

दुसऱ्यांदा प्रसारण स्थगित

Media One वर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधिही मार्च 2020 मध्ये, केंद्राने ईशान्य दिल्लीतील दंगलीचे अहवाल देतांना केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1998 चे उल्लंघन केल्याबद्दल 48 तासांसाठी चॅनलवर (Media) बंदी घातली. मात्र या बंदीच्या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, 10 वर्षांपूर्वी वाहिनीने दिलेल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात Media One हे चॅनल अपयशी ठरल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की माहिती आणि प्रसारण नियमांनुसार अपलिंकिंग आणि डाउनलिंकिंगसाठी गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी आवश्यक आहे. मात्र याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अद्याप ही निवेदन जारी केलेले नाही.

काय आहे जमात-ए-इस्लामी?

जमात-ए-इस्लामी ही ब्रिटिश राजवटीची एक संघटना आहे. याची स्थापना 1941 मध्ये म्हणजेच ब्रिटिश भारतात इस्लामिक-राजकीय संघटना आणि सामाजिक रूढीवादी चळवळ म्हणून झाली. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर, जमातचे भारत (India) आणि पाकिस्तानमधील दोन स्वतंत्र संघटनांमध्ये विभाजन झाले. त्यांची नावे अनुक्रमे जमात-ए-इस्लामी हिंद आणि जमात-ए-इस्लामी पाकिस्तान आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com