कपिल शर्मानं सांगितला मनमोहन सिंगांचा 'रेवडी' किस्सा

माजी पंतप्रधानांच्या पत्नीने त्यांना रेवडी खाण्यापासून कसे रोखले होते हा किस्साही त्याने सांगितला. कपिल शर्मा आणि मनमोहन सिंग हे दोघेही अमृतसरचे आहेत.
Manmohan sing and Kapil Sharma
Manmohan sing and Kapil Sharma Dainik Gomantak
Published on
Updated on

सध्या नेटफ्लिक्सवर कपिल शर्माचा स्टँडअप कॉमेडी शो आय एम नॉट डन यट (I'm Not Done Yet) मोठ्या प्रमणात पाहिल्या जात आहे. कपिल शर्मा ही या 1 तासाच्या शोमध्ये त्याच्या संघर्षाचे दिवस, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि प्रसिद्ध लोकांसोबतच्या वादांबद्दल बोलत आहे. ईतकेच नव्हे तर त्याने त्‍याच्‍या गिन्नीच्‍या लग्‍नापासूनच्‍या आयुष्‍यातील महत्‍त्‍वाच्‍या घटनाही सांगितल्‍या आहेत. असे सांगत असतांनाच त्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीचीही आठवण सांगितली. तसेच माजी पंतप्रधानांच्या पत्नीने त्यांना रेवडी खाण्यापासून कसे रोखले होते हा किस्साही त्याने सांगितला. कपिल शर्मा आणि मनमोहन सिंग हे दोघेही अमृतसरचे आहेत. Manmohan sing, Kapil Sharma And Rewadi

कपिलने केला मजेदार किस्सा शेअर

कपिल शर्मा आता ओटीटीवरही (Bollywood)प्रेक्षकांना हसवायला पोहोचला आहे. त्याचा स्टँडअप कॉमेडी शो आय एम नॉट डन यट हा खूप पाहिला जात आहे. यामध्ये कपिलने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक मजेशीर किस्से सांगितले आहेत. त्यात कपिलने मनमोहन सिंग यांच्या भेटीशी संबंधित एक मजेदार किस्सा आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केला. 2019 मध्ये तो कपिल शर्मा मनमोहन सिंग यांना भेटला होता. ते दोघेही अमृतसरचे असून दोघांनीही अमृतसरच्या हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.

मनमोहन सिंग व त्यांची पत्नी ,कपिल आणि रेवडी

कपिलने (Kapil sharma)सांगितले की, जेव्हा ते मनमोहन सिंग (Manmohan Sing)यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांना समजले की एवढ्या मोठ्या माणसावर खूप बंधने असतात. कपिल म्हणाला की, सुदैवाने एकदा मला मनमोहन सिंग यांना भेटण्याची संधी मिळाली आणि ते माझ्या शहरातील एक इंटेलेक्चुअल माणूस आहे. मी त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा हिवाळा असल्याने त्यांनी रेवडी ची ऑर्डर दिली. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या रेवड्या मुठीत घेताच त्यांच्या पत्नीने त्यांचा हात धरला आणि म्हणाली की, डॉक्टर साहेब तुम्हाला ही परवानगी नाही.

माजी पंतप्रधानांचे केले कौतुक

यावर कपिल म्हणतो की, असा प्रकार झाल्यामुळे मी विचारात पडलो, या माणसाने 10 वर्षे देश चालवला. एक वर्षाची रेवडी तर पकडा. त्यांना दहा रेवड्या तर खाऊ द्या. यानंतर कपिलने माजी पंतप्रधानांसोबतचे त्याचे फोटोही दाखवले आणि म्हणाला, हा फोटो आहे जेव्हा त्याच्याकडून रेवडी हिसकावून घेतली होती. त्यांनी प्रत्येक रेवडी आपल्या मुठीत धरली आहे. यानंतर कपिल गंभीर झाला आणि म्हणाला, क्या आदमी हैं, डॉक्टर साहब के लिए जोरदार तालियां हो जाएं...(काय माणूस आहे यार, डॉक्टरांना टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com