चर्चाच चर्चा! बॉसनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली BMW

चेन्नईस्थित एका आयटी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांसोबत असंच काहीसं घडल्याचं चित्र समोर आलं आहे.
BMW Car
BMW CarDainik Gomantak
Published on
Updated on

प्रामाणिकपणा, निष्ठा आणि चांगलं काम करणाऱ्यांसाठी नेहमीच बक्षीस असतं काही वेळा ते महागड्या बीएमडब्ल्यू कारच्या रूपात देखील मिळतं. चेन्नईस्थित एका आयटी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांसोबत असंच काहीसं घडल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यांनी कोविड-19 (Covid 19) महामारीच्या कठीण काळातही कंपनीला या कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली आहे. याबदल्यात त्यांच्या बॉसने त्यांना महागडी बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली आहे. जागतिक सॉफ्टवेअर सेवा प्रदाता Kissflow Inc ने शुक्रवारी त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापन अधिकार्‍यांना कंपनीच्या प्रती त्यांची निष्ठा आणि वचनबद्धता लक्षात घेऊन या सर्वांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या पाच BMW कार भेट दिल्या आहेत. (The boss gifted a BMW to five employees of a Chennai-based IT company)

BMW Car
IIIT लखनऊमधील विद्यार्थ्याला मिळाले तब्बल 1.2 कोटींचे पॅकेज

हे भारताची (India) नवीन वाहतूक प्रणाली आहे! डोंगर-दऱ्यांमध्ये हवेतून जाताना दिसतील केबल कार पुरस्कार सोहळा गुप्त ठेवण्यात आली होती आणि पुरस्कार विजेत्यांना या महागड्या आणि आलिशान कार घेण्याचा विशेषाधिकार देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. Kissflow Inc. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुरेश संबंदम यांच्या मते, सन्मानित करण्यात आलेले पाच लोक कंपनीच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत आणि संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत आहेत.

BMW
BMWDainik Gomantak

त्यांनी सांगितलं की, ज्या लोकांना कार देण्यात आली आहे, त्यापैकी काही साध्या पार्श्वभूमीचे आहेत आणि कंपनीमध्ये येण्यापूर्वी त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं.

BMW Car
बलात्कार खुनापेक्षाही भयंकर, आत्म्यावर आघात: POSCO Court

अशाच प्रकारे ब्रिटनमध्येही एका बॉसने कर्मचाऱ्यांना वाटले होते 37 लाख रुपये,

ब्रिटनच्या एमरी टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सचे (Emery Timber & Builders Merchants) व्यवस्थापकीय संचालक जेम्स हिपकिन्स यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक जबरदस्त भेट दिली होती. त्यांनी कंपनीच्या 60 सदस्यांमध्ये सुमारे 37 लाख रुपये वाटले होते. या कंपनीच्या बॉसने (Company Boss) आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुमारे 62-62 हजार रुपये रक्कम दिली होती.

जेणेकरून त्यांना वीज बिलाच्या वाढीव दरामुळे कोणतीही अडचण यायला नको. जर कंपनी नफा कमवत असेल तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला मिळायला हवा, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. जेम्स यांनी यावर बोलताना सांगितलं होतं की, हे पैसे त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मदत करतील. यूकेमध्ये मूलभूत गोष्टींच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत, अशा परिस्थितीत कंपनीच्या मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करायला हवी, असे जेम्सला वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com