Investigation Into Murder Of Kashmiri Pandit Judge Neelkanth Ganjoo Resumes After 30 Years:
काश्मिर खोर्यातील पंडितांबाबतच्या नव्या घडामोडी घडत असून, जम्मू आणि काश्मीर राज्य तपास यंत्रणेने नुकतेच निवृत्त न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या 33 वर्ष जुन्या खून प्रकरणाची चौकशी सुरू केली.
काश्मिरी पंडित असलेले निवृत्त न्यायाधीश नीलकंठ गंजू यांची 1989 मध्ये अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले होते.
जम्मू आणि काश्मीरमधील राज्य तपास एजन्सीने सोमवारी काश्मिरी पंडितांच्या टारगेट किलींगमागचा (Target Killing) गुन्हेगारी कट शोधण्यासाठी सामान्य लोकांकडून माहिती आणि तपशील गोळा करत आहेत.
न्यायाधीश नीलकंठ गंजू यांनी 1960 मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) संस्थापक आणि दहशतवादी (Terrorist) मोहम्मद मकबूल भट यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
पोलीस अधिकारी अमर चंद यांच्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात मकबूल भटला दोषी ठरवण्यात आले होते.
यानंतर 1989 मध्ये अतिरेक्यांनी नीलकंठ गंजू यांना गोळ्या घालून ठार मारले होते. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर केलेल्या लक्ष्यित हल्ल्यात अतिरेक्यांनी मारले गेलेल्या प्रमुख काश्मिरी पंडितांपैकी न्यायाधीश गंजू एक होते.
काश्मीरमधील उच्च न्यायालयाचे (High Court Of Jammu And Kashmir) न्यायाधीश असलेल्या गंजू यांची ४ नोव्हेंबर १९८९ रोजी हरिसिंह स्ट्रीट मार्केटमध्ये असताना तीन अतिरेक्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. म्हटले आहे.
"तीन दशकांपूर्वी निवृत्त न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या हत्येमागील मोठ्या गुन्हेगारी कटाचा पर्दाफाश करण्यासाठी, राज्य तपास यंत्रणेने (SIA) एका निवेदनाद्वारे, या हत्या प्रकरणाशी संबंधीत माहिती असणाऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत माहिती देणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन राज्य तपास यंत्रणेने दिले आहे. तसेच उपयुक्त माहिती देणाऱ्यांना बक्षिस देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.