Manmohan Singh in Rajya Sabha: राज्यसभेत व्हीलचेअरवर पोहचत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जिंकलं इंटरनेट

Manmohan Singh: सोमवारी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा झाली. ९० वर्षांचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही चर्चेत भाग घेतला. त्याच्या उपस्थितीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Former Prime Minister Manmohan Singh Reach Rajya Sabha in a Wheelchair
Former Prime Minister Manmohan Singh Reach Rajya Sabha in a WheelchairDainik Gomantak
Published on
Updated on

Former Prime Minister Manmohan Singh Reaches Rajya Sabha in a Wheelchair: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही दिल्ली सेवा विधेयकावरील (Delhi Services Bill) चर्चेत भाग घेतला.

राज्यसभेत विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी ते व्हीलचेअरवर पोहोचले.

मनमोहन यांच्या उपस्थितीने अनेकांना आश्चर्य वाटले. त्यांची प्रकृती ठीक नाही. मनमोहन सिंग 90 वर्षांचे आहेत.

सभागृहाच्या चर्चेत त्यांची उपस्थिती यावरून त्यांना संसदीय प्रक्रियेवर किती प्रेम आहे हे दिसून येते. तसेच मनमोहन सिंग यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.

गेल्या वर्षीही 18 जुलै रोजी माजी पंतप्रधान आणि काँग्रेस खासदार मनमोहन सिंग हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आले होते.

यादरम्यान सिंग यांना व्हीलचेअरवर बसवून तेथे आणण्यात आले होते. तसे, दिग्गज राजकीय नेते अशा प्रकारे मतदानासाठी पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही.

त्याआधी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एकदा व्हीलचेअरचा आधार घेऊन राष्ट्रपतीपदासाठी मतदानासाठी पोहोचले होते.

डॉ. सिंग यांचे काम बोलते...

डॉ. मनमोहन सिंग यांच्या संसदेतील व्हिलचेअरवचा फोटो ट्विट करत एक यूजर म्हणाला,

"सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संसदेचे अधिवेशन टाळत उद्घाटने करत फिरत आहेत. अन् माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग वयाच्या 90 व्या वर्षी संसदेत हजेरी लावत कामकाजात सहभागी होत आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्यावतीने बोलण्यासाठी न्यूज चॅनेलची नियुक्ती केली नाही, कारण त्यांनी त्यांच्या कामातूनच प्रतिमा निर्माण केली आहे."

Former Prime Minister Manmohan Singh Reach Rajya Sabha in a Wheelchair
Divorce: 38 वर्षे तारीख पे तारीख! निवृत्त इंजीनिअरला घटस्फोटासाठी पाहावी लागली 4 दशके वाट

देशाचा अंदाज चुकला...

यावेळी रोशन राय नावाचा दुसरा एक यूजर म्हणाला,

"गंभीर आजारी असलेले 90 वर्षांचे डॉ. मनमोहन सिंग व्हील चेअरला खिळून आहेत. तरीही राज्यसभेत आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि लोकशाही विरोधी दिल्ली सेवा दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान करण्यासाठी आले.

डॉ. मनमोहन सिंग यांचाबाबत देशाने चुकीचा अंदाज लावला होता, ते केवळ एक खंबीर पंतप्रधानच नव्हते तर एक समर्पित आणि प्रतिष्ठित लिडरही होते.

अनेकांसाठी धडा...

राज्यसभेत सोमवारी दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा झाली. यासाठी मतदान होणार होते. डॉ. मनमोहन सिंग हे काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे सदस्य आहेत.

वय झाले असले तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. त्यांचा चर्चेतील सहभाग हेच दर्शवतो.

जे खासदार सभागृहाचे कामकाज गांभीर्याने घेत नाहीत त्यांच्यासाठीही हा धडा आहे.

Former Prime Minister Manmohan Singh Reach Rajya Sabha in a Wheelchair
Manipur Violence: महाराष्ट्राचे माजी डीजीपी ठेवणार सीबीआय तपासावर देखरेख

दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर

दिल्ली सेवा विधेयक सोमवारी (7 ऑगस्ट) राज्यसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 131 तर विरोधात 102 मते पडली.

सभागृहात 'आप' (AAP), काँग्रेस व्यतिरिक्त विरोधी आघाडी INDIA तील सर्व घटक पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली अध्यादेशाशी संबंधित विधेयक राज्यसभेत मांडले. ज्याला बिजू जनता दल (BJD) आणि वायएसआर काँग्रेस पार्टी (YSRCP) यांनीही पाठिंबा दिला होता.

या विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शहा (Amit Shah) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वादावादी झाली.

दिल्लीत भ्रष्टाचारमुक्त (Corruption Free) प्रशासन सुनिश्चित करणे हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com