पंजाबमध्ये भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने सत्तेत येताच मोफत वीज देण्याच्या आश्वासनाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब सरकारकडून शनिवारी पंजाबमधील (Punjab) प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा नियम 1 जुलै 2020 पासून लागू होईल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते की, ''पंजाबमधील लोकांना 300 युनिट वीज मोफत देण्याच्या योजनेची ब्लू प्रिंट जवळपास तयार आहे. त्याचवेळी, मंगळवारी मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले होते की, आमचे सरकार लवकरच राज्यातील जनतेला एक 'गुड न्यूज' देणार आहे.'' या प्रकरणी त्यांच्या पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी ट्विट करत सांगितले होते.
मात्र, मे-जून हा प्रामुख्याने भात रोवणीचा मुहूर्त असताना जुलैपासून मोफत वीजपुरवठा सुरु होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा आवश्यक आहे. पंजाबमधील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याने आणि रोवणीच्या हंगामानंतर हा नियम लागू केला जात असल्याने त्याचा काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे, असे मानले जात होते की, सरकार आपल्या घोषणेच्या वेळेवर पुनर्विचार करु शकते. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारही दिल्लीत 200 युनिट वीज मोफत देते. पंजाबमधील निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी विजेचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता.
याशिवाय, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार आल्यापासून भगवंत मान यांनी अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. ज्यांची निवडणूकपूर्वी आश्वासने दिली होती. रेशन घरोघरी पोहोचवण्याची योजना गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती. त्याचबरोबर मार्चमध्येही मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत विविध सरकारी खात्यांमध्ये 25 हजार भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी पोलीस खात्यात 10 हजार भरती करायच्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.