बोम्मई सरकारला मोठा झटका, मंत्री केएस ईश्वरप्पा देणार राजीनामा

कंत्राटदाराच्या आत्महत्येवरुन वादात सापडलेले कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) राजीनामा देणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
K. S. Eshwarappa
K. S. EshwarappaDainik Gomantak

कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी वादात सापडलेले कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा राजीनामा देणार आहेत. ही माहिती देताना त्यांच्या सचिवाने सांगितले की, 'ईश्वरप्पा उद्या राजीनामा देणार आहेत.' विशेष म्हणजे बोम्मई सरकारचे (Bommai Government) ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर संतोष पाटील या ठेकेदाराने ‘कमिशन’ मागितल्याचा आरोप केला होता. पाटील यांनी मंगळवारी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संतोष पाटील यांचा मृतदेह एका खासगी लॉजच्या रुममध्ये आढळून आला. या कंत्राटदाराने व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेजमध्ये ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन उडुपीमध्ये आत्महत्या केली होती. (Karnataka minister K. S. Eshwarappa to resign over controversy over contractor's suicide)

K. S. Eshwarappa
अखंड भारताबाबत मोहन भागवतांचं मोठं विधान

दरम्यान, या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काँग्रेस विरोधी पक्ष ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करु लागले. स्वतःला भाजपचे (BJP) कार्यकर्ता म्हणवणाऱ्या पाटील यांनी 30 मार्च रोजी आरडीपीआर विभागात एक काम केले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची रक्कम मागितली. परंतु 4 कोटी रुपयांच्या कामासाठी ईश्वरप्पा यांनी 40 टक्के कमिशन पाटील यांच्याकडे मागितले होते.

तसेच, कंत्राटदाराने आपल्या सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध उडुपी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या भावाने मंत्र्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ईश्‍वरप्पा यांचे दोन सहकारी बसवराज आणि रमेश यांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com