
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहास रचला. आफ्रिकन संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने हरवून जेतेपद पटकावले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने एक मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्या संघाला स्लेज करण्यासाठी चोक शब्दाचा वापर केला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार टेम्बा बावुमानं एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. सामना दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्या संघावर सतत स्लेजिंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बावुमा म्हणाला, जेव्हा आमचा संघ फलंदाजी करत होता, तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘चोकर्स-चोकर्स-चोकर्स’ असे शब्द उच्चारून आम्हाला मानसिकदृष्ट्या डगमगवण्याचा प्रयत्न करत होते.
या सगळ्या गोष्टींचा आमच्या संघावर कुठलाही नकारात्मक परिणाम झाला नाही, असंही बावुमांनी स्पष्ट केलं. आम्ही खूप आत्मविश्वासाने मैदानात उतरलो होतो. आम्ही अंतिम फेरी गाठली आणि अनेक लोकांनी आमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मात्र या विजयातून आम्ही आमच्यावर शंका घेणाऱ्यांना योग्य उत्तर दिलं आहे, असं टेम्बा बावुमा म्हणाला.
२०२५ च्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत शानदार शतक ठोकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाज एडन मार्करामने विजयानंतर भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, आता 'चोकर्स' हा अपमानास्पद टॅग दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी जोडला जाणार नाही.
मार्कराम म्हणाला, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात ‘चोकर्स’ हा शब्द खूप वेळा वापरण्यात आला. मात्र या विजयानंतर तो शब्द इतिहासात जमा होईल, अशी आम्हा सर्वांची भावना आहे. जिंकणे हीच आमची प्राथमिकता होती, पण त्याचबरोबर हा 'चोकर्स' टॅग कायमचा काढून टाकणं हे आमच्यासाठी मोठं उद्दिष्ट होतं.
या सामन्यात मार्करामने निर्णायक क्षणी दमदार शतक ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप जिंकत क्रिकेट इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.
दक्षिण आफ्रिकेने शेवटची आयसीसी ट्रॉफी १९९८ मध्ये जिंकली होती. तेव्हापासून, संघाने अनेक वेळा आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत पोहोचण्यात यश मिळवले आहे परंतु कधीही ट्रॉफी जिंकू शकला नाही. यामुळे, त्यांना चोकर्सचा टॅग देण्यात आला होता. पण आता त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद जिंकून हा टॅग काढून टाकला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.