Manish Jadhav
टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 'पंच' ची किंमत वाढवली आहे. आता ही स्वस्त एसयूव्ही ग्राहकांना महाग पडणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीसह, कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही पंचची किंमत देखील 7,000 रुपयांनी वाढवून 17,000 रुपये एवढी केली.
पूर्वी पंचची किंमत 6.13 लाख रुपये (एक्स-शोरुम) पासून सुरु होत होती, आता त्याच कारची किंमत 6.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होते आणि 10.32 लाख रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत जाते.
व्हेरिएंटनुसार किंमत वाढ कमी-अधिक असू शकते. टाटा पंच 9 व्हेरिएंटमध्ये आणि 6 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
टाटा पंचमध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 72.5 पीएस आणि 103 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
सुरक्षेसाठी पंचमध्ये आतापर्यंत फक्त 2 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत, तर त्याच किंमत श्रेणीतील इतर मॉडेल्समध्ये तुम्हाला 6 पर्यंत एअरबॅग्ज मिळतात.
तुम्ही पंच पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये खरेदी करु शकता.