

२०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपले सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी केली होती, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या मागणीला केराची टोपली दाखवल्याचे समजते. आयसीसीच्या या भूमिकेमुळे बांगलादेश क्रिकेटला मोठा धक्का बसला असून, त्यांना आता भारतातच खेळावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक भूमिका घेतली होती. भारताशी असलेल्या क्रिकेट संबंधांमधील तणावामुळे, बांगलादेशने आपले सर्व सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्यासाठी आयसीसीला दोनदा अधिकृत ईमेल पाठवले होते. मात्र, जागतिक क्रिकेट नियामक मंडळाने यजमान देश बदलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
आयसीसीने बांगलादेशची 'देश बदलण्याची' मागणी फेटाळली असली तरी, सुरक्षेच्या आणि तांत्रिक कारणास्तव सामन्यांची ठिकाणे (Venues) बदलण्याचा विचार सुरू केला आहे.
ताज्या अहवालानुसार, बांगलादेशचे जे सामने कोलकाता आणि मुंबईत होणार होते, ते आता चेन्नई आणि तिरुवनंतपुरम येथे हलवले जाऊ शकतात. तामिळनाडू आणि केरळ क्रिकेट असोसिएशनने या बदलांसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. जर हा बदल झाला, तर तिरुवनंतपुरममध्ये तीन आणि चेन्नईत एक सामना खेळवला जाईल.
सध्याच्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशचे पहिले तीन सामने कोलकाता येथे ७ फेब्रुवारीला वेस्ट इंडिज, ९ फेब्रुवारीला इटली आणि १४ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध होणार आहेत. तसेच साखळी फेरीतील शेवटचा सामना १७ फेब्रुवारीला मुंबईत खेळवला जाणार आहे.
आयसीसी या वेळापत्रकात फेरबदल करून केवळ ठिकाणे बदलण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे बांगलादेशची श्रीलंकेत खेळण्याची आशा धुळीस मिळाली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीचा हा संयुक्त निर्णय बांगलादेशसाठी एक मोठा 'तगडा झटका' मानला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.