Surykumar Yadav: "सूर्या मला खूप मेसेज करायचा" प्रसिध्द अभिनेत्रीच्या दाव्यानं क्रिकेट विश्वात खळबळ Watch Video

Suryakumar Yadav Khushi Mukherjee: भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
Suryakumar Yadav Khushi Mukherjee
Suryakumar Yadav Khushi MukherjeeDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ग्लॅमर आणि क्रिकेटचे नाते जुनेच असले तरी, प्रसिद्ध अभिनेत्री खुशी मुखर्जीने केलेल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. खुशीने दावा केला आहे की, सूर्यकुमार यादव तिला मेसेज करायचा, मात्र आता त्यांच्यात संवाद होत नाही. आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या खुशीच्या या विधानामुळे क्रिकेट प्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुशीने क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटींसोबतच्या तिच्या संबंधांवर भाष्य केले. ती म्हणाली, "अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता आमच्यात जास्त बोलणे होत नाही." विशेष म्हणजे, तिने हेदेखील स्पष्ट केले की तिला कोणत्याही क्रिकेटरसोबत नाव जोडले गेलेले आवडत नाही. लिंकअपच्या बातम्यांपासून दूर राहणेच ती पसंत करते, असेही तिने यावेळी नमूद केले.

Suryakumar Yadav Khushi Mukherjee
Gautam Gambhir: "आधी रणजी ट्रॉफीमध्ये मध्ये कोचिंग करा..." इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं गौतम गंभीरची उडवली खिल्ली!

खुशी मुखर्जी केवळ या दाव्यामुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका दुर्दैवी घटनेमुळेही चर्चेत होती. तिने अलीकडेच खुलासा केला होता की, तिच्या काही मित्रांनी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरातील २५ लाख रुपयांचे दागिने चोरले. "जेव्हा मित्रच शत्रू बनतात आणि यशामुळे त्यांच्यात मत्सर निर्माण होतो, तेव्हा काय करावे?" असा उद्विग्न सवाल तिने उपस्थित केला होता. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या कोलमडली होती, परंतु तिने धैर्याने या परिस्थितीचा सामना केला.

Suryakumar Yadav Khushi Mukherjee
Goa Nightclub Fire: ‘बर्च’ नाईटक्लब आगप्रकरणी नवी अपडेट! गोवा खंडपीठासमोर अहवाल सादर; अवैध बांधकाम, नियमभंग, प्रशासनावर आसूड

कोण आहे खुशी मुखर्जी?

कोलकाता येथे जन्मलेली २९ वर्षीय खुशी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने २०१३ मध्ये तमिळ चित्रपट 'अंजल थुरई'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. मात्र, तिला खरी प्रसिद्धी 'एमटीव्ही स्प्लिट्सविला १०' आणि 'लव स्कूल ३' यांसारख्या प्रसिद्ध रिॲलिटी शोमधून मिळाली. सध्या ती सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंमुळे प्रचंड सक्रिय असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com