

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या टीकेच्या धनी ठरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे क्रिकेट वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे. गंभीर यांच्या रणनीतीवर आणि प्रशिक्षणाच्या पद्धतीवर आता परदेशी माजी खेळाडूही उघडपणे बोलू लागले आहेत. इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसर याने गंभीर यांच्यावर सडकून टीका करताना त्यांना थेट रणजी ट्रॉफीमध्ये जाऊन कोचिंग करण्याचा सल्ला दिला आहे.
मॉन्टी पनेसरच्या मते, गौतम गंभीर हे मर्यादित षटकांच्या (व्हाइट बॉल) क्रिकेटसाठी एक उत्तम प्रशिक्षक असू शकतात, कारण तिथे त्यांनी यश मिळवले आहे. मात्र, कसोटी क्रिकेटची (रेड बॉल) गणितं वेगळी असतात.
पनेसर म्हणाला की, "गौतम गंभीर यांनी रणजी ट्रॉफीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करायला हवे. तिथे त्यांनी अशा अनुभवी प्रशिक्षकांशी संवाद साधायला हवा ज्यांनी यशस्वीपणे लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघ बांधणी केली आहे." पनेसरने पुढे स्पष्ट केले की, सध्याचा भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये पूर्वीसारखा बलाढ्य राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
भारतीय संघातील बदलांच्या काळावर भाष्य करताना पनेसरने विराट कोहलीच्या अनुपस्थितीवर बोट ठेवले. जेव्हा संघातून दिग्गज खेळाडू निवृत्त होतात किंवा बाहेर पडतात, तेव्हा त्यांची जागा भरणे कठीण असते.
पनेसरच्या मते, "एकवेळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कोहलीची उणीव भासणार नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कमतरता स्पष्टपणे जाणवतेय. मैदानावर जी आक्रमकता असायची, ती आता गंभीर यांच्या मार्गदर्शनाखालील संघात दिसत नाहीये."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.