
आशिया कप २०२५ चा थरारक अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर सहज मात करत नवव्यांदा आशिया चषक जिंकला आहे.
सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने भावनिक निर्णय घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने आशिया कपमधून मिळालेली संपूर्ण मॅच फी भारतीय सैन्याला दान करण्याचा निर्णय जाहीर केला. "देशासाठी लढणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागापुढे आमच्या या यशाचं काहीच मोल नाही. म्हणूनच हा विजय मी जवानांना अर्पण करतो," असे सूर्यकुमार यादवने सांगितले.
फायनल सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव अपेक्षेप्रमाणे उभा राहू शकला नाही. चांगल्या सुरुवातीनंतरदेखील संपूर्ण संघ फक्त १९.१ षटकांत १४६ धावांवर गारद झाला.
विजयासाठी भारताला १४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वासपूर्ण खेळ करत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ विकेट्स राखत हे लक्ष्य पार केलं. भारतानं नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे.
पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. २० धावांवर भारताचे तीन विकेट गेले. अभिषेक शर्मा (५), कर्णधार सूर्यकुमार यादव (१) आणि शुभमन गिल (१२) १२ धावांवर बाद झाले. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी ५० चेंडूत ५७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अबरार अहमदने संजू सॅमसनला बाद केले. संजूने २१ चेंडूत २४ धावा केल्या, त्यात दोन चौकार आणि एक षटकार मारला.
त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबेने पाचव्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या आणि संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला. नंतर, फरीम अशरफने दुबेला बाद केले, ज्यामुळे सामना थोडा रोमांचक झाला. शिवम दुबेने २२ चेंडूत ३३ धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार मारले.
भारत : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.