ISIS Gujarat Module: गुजरातमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, 4 जण गजाआड; सीमेपलीकडे बनले 'कट्टरपंथी'

ISIS Module In Gujarat: गुजरातमधून मोठी बातमी येत आहे, जिथे ATS ने ISIS मॉड्यूल पकडले आहे. पोरबंदर येथून एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
ISIS
ISISDainik Gomantak

ISIS Module In Gujarat: गुजरातमधून एक मोठी बातमी येत आहे, जिथे ATS ने ISIS मॉड्यूल पकडले आहे. पोरबंदर येथून एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आणखी एकाला पकडण्यासाठी पथक छापेमारी करत आहे. याप्रकरणी सुमैरा नावाच्या सुरतच्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे. हे जाळे इतर राज्यांमध्येही पसरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेले चार जण आयएसआयएसच्या सक्रिय गटाचे सदस्य आहेत, ज्यांच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. याठिकाणी अनेक प्रतिबंधित वस्तूही सापडल्या आहेत. हे चौघेही आयएसआयएसमध्ये (ISIS) सामील होण्यासाठी पळून जात होते, गेल्या 1 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे, त्यांच्या हँडलरच्या सांगण्यावरुन सीमेपलीकडे कट्टरपंथी बनले.

ISIS
Gujarat Crime: 73 वर्षीय व्यक्तीने कोर्टाबाहेर पत्नीवर केला हल्ला, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

ISIS मॉड्यूलचा भंडाफोड

डीआयजी (DIG) दीपन भद्रन आणि एसपी (SP) सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरापासून पोरबंदरमध्ये कारवाई सुरु होती. एटीएसला मागील काही महिन्यांपासून यासंबंधी माहिती मिळत होती. तेव्हापासून आरोपींची (Accused) ओळख पटली होती आणि सर्वांवर नजर ठेवली जात होती.

ISIS चे अनेक राज्यांमध्ये जाळे

एटीएसच्या पथकाने पोरबंदरमधून इसिसच्या दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांचे जाळे देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. छाप्यामध्ये प्रतिबंधित वस्तूही सापडल्या आहेत. नुकतेच एनआयएने मध्य प्रदेशात 3 जणांना अटक करुन ISIS शी संबंधित दहशतवादी (Terrorist) मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता.

ISIS
Gujarat: धक्कादायक! गुजरातमधून पाच वर्षांत 40 हजारांहून अधिक महिला बेपत्ता ; NCRB ची आकडेवारी

मध्यप्रदेशात एनआयएची कारवाई

एनआयएने मध्यप्रदेशच्या एटीएससोबत संयुक्त कारवाई करत जबलपूरमध्ये 13 ठिकाणी छापे टाकून या लोकांना अटक केली होती. सय्यद ममूर अली, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद आदिल खान अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, बनावट कागदपत्रे, दारुगोळा आणि डिजिटल साधने जप्त करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com