Success Story: घरच्यांकडून पॉकेटमनी मागायच्या वयात, ड्रॉप आऊट तरुणाने उभारली 7300 कोटींची कंपनी

Kaivalya Vohra Of Zepto: ज्या वयात तुम्ही तुमच्या घरच्यांकडून पॉकेटमनी मागता, त्या वयात तरुणांने 7300 कोटींची कंपनी उभी केली आहे. या तरुणाची वार्षिक कमाई 1200 कोटी रुपये आहे.
Kaivalya Vohra Of Zepto.
Kaivalya Vohra Of Zepto.Dainik Gomantak

Kaivalya Vohra And Aadit Palicha Founded Zepto Company Worth 7300 Crore:

जब हौसला बना लिया ऊंची  उड़ान का  
फिर देखना  फिजूल है कद आसमान का !

या ओळी मुंईच्या 19 वर्षांचा तरुण उद्योजक कैवल्य वोहराचे कर्तुत्व सांगण्यासाठी पुरेशा आहेत.

ज्या वयात तुम्ही तुमच्या घरच्यांकडून पॉकेटमनी मागता, त्या वयात एका 19 वर्षांच्या मुलाने 7300 कोटींची कंपनी उभी केली आहे. या तरुणाची वार्षिक कमाई 1200 कोटी रुपये आहे.

यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, एका हिट कल्पनेने कैवल्य वोहराचे नशीब बदलले. कैवल्य हा ऑनलाइन किराणा डिलिव्हरी अ‍ॅप Zepto चा सह-संस्थापक आहेत. आणि तो फक्त 19 वर्षांचा असताना त्याने झेप्टो सुरू केले होते.

स्टॅफोर्ड विद्यापीठाला रामराम

मुंबईचा रहिवासी असलेल्या कैवल्य वोहराचा जन्म 2001 साली झाला. त्याचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. त्यानंतर तो अमेरिकेतील स्टॅफोर्ड विद्यापीठात (Stanford University) अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेला. पण एके दिवशी त्याने आपली कल्पना त्याचा वर्गमित्र आदित पालीचा याला सांगितली आणि मग शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला.

यानंतर दोघेही त्यांच्या ई-ग्रोसरी कंपनीत काम करू लागले. आदित पालीचालाही काहीतरी वेगळं करण्याची हौस होती. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यानं पहिला स्टार्टअप सुरू केला. ज्याचे नाव गोपूल (GoPool) होते.

Kaivalya Vohra and Aditya Palicha were studying engineering together at Stafford University in the US.
Kaivalya Vohra and Aditya Palicha were studying engineering together at Stafford University in the US.Dainik Gomantak

अशी झाली झेप्टोची सुरुवात

झेप्टो सुरू करण्याची कल्पना या दोघांना कॉलेजमध्ये असतानाच सुचली. जेव्हा ते कोणतेही किराना सामान मागवायचे तेव्हा ते सामान त्याच्यापर्यंत पोहोचायला किमान दोन दिवस लागायचे.

याला कंटाळल्याने त्यांना एक कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली जी काही तासांत तुमच्या घरी जे लागेल ते सामान पोहोचवेल. त्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये कोरोनाच्या काळात झेप्टोची सुरुवात केली. कंपनीची सुरुवात मुंबईत 1000 कर्मचारी आणि डिलिव्हरी एजंट्ससह करण्यात आली होती.

Kaivalya Vohra Of Zepto.
Success Story: हसण्या खेळण्याच्या वयात उभारली 100 कोटींची कंपनी; मुंबईच्या तिलकची महिन्याला करोडोंची कमाई

1 वर्षात 7300 कोटींची झेप

झेप्टोची सुरुवात कोरोनाच्या काळात झाली, जेव्हा लोकांना घराबाहेर पडणे धोक्याचे वाटायचे. त्यांच्यासाठी ही मोठी संधी होती. त्याचा फायदाही त्यांनी घेतला.

कंपनी सुरू होताच एका महिन्यात त्यांनी 20 कोटी रुपये कमावले. एका वर्षात कंपनीचे मूल्य 7300 कोटींच्या पुढे गेले. आता झेप्टोचा संस्थापक कैवल्य वोहरा याची एकूण संपत्ती 1,200 कोटींच्या पुढे गेली आहे.

Zepto currently operates in 10 major cities in India With more than 1,000 employees.
Zepto currently operates in 10 major cities in India With more than 1,000 employees.Dainik Gomantak

10 मिनिटांत डिलिव्हरी

सुरुवातीला, झेप्टोला सामानाची ग्राहकाला डिलिव्हरी करण्यासाठी 45 मिनिटांपर्यंत वेळ लागत असे, परंतु कैवल्यला लक्षात आले की, ज्या ग्राहकांना लवकर डिलिव्हरी मिळायची ते त्यांच्या सेवेबद्दल अधिक समाधानी होते आणि त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ऑर्डर करायचे. यासाठी त्यांनी झेप्टोमध्ये 10 मिनिटांत डिलिव्हरी संकल्पनाही राबवली.

आधीपासून बाजारात असलेल्या ब्लिकिंट (Blinkit) आणि बिग बाजार (Big Bazaar) सारख्या दिग्गजांशी सामना करण्यासाठी Zepto ला 10 मिनिटांत डिलिव्हरी यासारख्या कल्पनेची आवश्यकता होती.

पुढे कंपनीने काही महिन्यांतच बंपर नफा कमावला. गेल्या एका वर्षात, त्याचे मूल्यांकन 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. आज Zepto चे मूल्यांकन 7300 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Kaivalya Vohra Of Zepto.
Success Story: अवघ्या 25 व्या वर्षी युट्युबरने कमावले 800 कोटी

झपाट्याने विस्तार

Zepto सध्या भारतातील 10 प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनी सतत आपले नेटवर्क वाढवत आहे. कंपनीत 1,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर 3,000 हून अधिक उत्पादने वितरीत करते. त्‍याच्‍या वेगवान डिलिव्‍हरी सेवेमुळे, कंपनी केवळ बाजारात स्थिरच नाही तर सतत नफा कमवत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com