Sourav Ganguly: 'दादा' पुन्हा अध्यक्षपदी विराजमान, पदभार स्वीकारताच 'T20 World Cup'बाबत केली मोठी घोषणा

Sourav Ganguly CAB President: माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सौरव गांगुली पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (CAB) अध्यक्ष बनले आहेत.
Sourav Ganguly CAB President
Sourav Ganguly CAB PresidentDainik Gomantak
Published on
Updated on

कोलकाता : माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सौरव गांगुली पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (CAB) अध्यक्ष बनले आहेत. सोमवारी झालेल्या ९४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची बिनविरोध निवड झाली. सहा वर्षांपूर्वी गांगुली यांनी हीच जबाबदारी सांभाळली होती, मात्र २०१९ मध्ये बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अध्यक्षपदी परतल्यानंतर गांगुलीनं पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमची आसनक्षमता वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्याचबरोबर २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकातील शक्य तितके सामने कोलकात्यात खेळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

Sourav Ganguly CAB President
Goa Beach Shack: शॅक उभारणी सुरू! UK, डेन्मार्कचे पर्यटक येणार; पर्यटन हंगाम ठरणार लाभदायक

गांगुली म्हणाला, "ईडन गार्डन्सचे पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे ही आमची प्राथमिकता आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात कोलकात्यात जास्तीत जास्त सामने होतील यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."

याशिवाय त्यांनी कसोटी क्रिकेटलाही विशेष महत्त्व दिले. आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याचे आयोजन ईडन गार्डन्समध्ये होणार असून, त्यासाठी विशेष तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गांगुली म्हणाला, "दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक ठरेल. ईडन गार्डन्सकडे उत्तम पिच, उत्कृष्ट स्टेडियम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्साही चाहते आहेत."

Sourav Ganguly CAB President
KL Rahul Goa Guardians: केएल राहुलची नवी इनिंग! गोवा गार्डियन्स संघाचा बनला सहमालक; प्राईम व्हॉलिबॉल लीगमध्ये पदार्पण

दरम्यान, गांगुली पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होती. त्यांनी याआधी २०१९ ते २०२२ या काळात बीसीसीआय अध्यक्ष म्हणून काम केले होते. मात्र, यावेळी मिथुन मनहास यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. गांगुली म्हणाले, "मी बीसीसीआयच्या बैठकीत सीएबीचे प्रतिनिधित्व करेन. नवीन अध्यक्ष मिथुन मनहास चांगले काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा."

गांगुलींच्या पुनरागमनामुळे बंगाल क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ईडन गार्डन्सच्या आधुनिकीकरणाबरोबरच विश्वचषकातील मोठ्या सामन्यांचे आयोजन कोलकात्याला मिळावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com