KL Rahul Goa Guardians volleyball
KL Rahul Goa Guardians volleyballDainik Gomantak

KL Rahul Goa Guardians: केएल राहुलची नवी इनिंग! गोवा गार्डियन्स संघाचा बनला सहमालक; प्राईम व्हॉलिबॉल लीगमध्ये पदार्पण

KL Rahul Prime Volleyball: प्राईम व्हॉलिबॉल लीगचा चौथा मोसम २ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत खेळला जाईल. ‘‘केवळ समर्थक म्हणून नव्हे, तर सहमालक या नात्याने गोवा गार्डियन्समध्ये सहभागी होणे माझ्यासाठी रोमांचक अनुभव आहे.
Published on

पणजी: भारताचा प्रमुख कसोटी क्रिकेटपटू केएल राहुल आता व्हॉलिबॉल कोर्टवर उतरला आहे. आगामी प्राईम व्हॉलिबॉल लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या गोवा गार्डियन्स संघाचा सहमालक या नात्याने ३३ वर्षीय शैलीदार फलंदाजाने नवी ‘इनिंग’ सुरू केली.

प्राईम व्हॉलिबॉल लीगचा चौथा मोसम २ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत खेळला जाईल. ‘‘केवळ समर्थक म्हणून नव्हे, तर सहमालक या नात्याने गोवा गार्डियन्समध्ये सहभागी होणे माझ्यासाठी रोमांचक अनुभव आहे.

KL Rahul Goa Guardians volleyball
B L Santosh Visit: भाजप नेत्यांची मंगळवारपासून कसोटी! राष्ट्रीय सचिव संतोष होणार गोव्यात दाखल; 'मंत्रिमंडळ' विषय ऐरणीवर

व्हॉलिबॉल या खेळाची मी नेहमीच आनंद लुटलेला आहे. देशात या खेळाच्या विकासात योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ अशी प्रतिक्रिया राहुल याने दिली. गोवा गार्डियन्सचे मुख मालक राजू चेकुरी यांनी सहमालक या नात्याने केएल राहुल याचे संघात स्वागत केले आहे.

KL Rahul Goa Guardians volleyball
Goa Sports Policy: राज्यासाठी नवे क्रीडा धोरण डिसेंबरपर्यंत आखणार! गावडेंची घोषणा; प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणार

राज चेकुरी या संघाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. संघासाठी सहमालक या नात्याने केएल राहुल योग्य व्यक्ती असल्याचे राज यांनी म्हटले आहे. प्राईम व्हॉलिबॉल लीगचे सीईओ जॉय भट्टाचार्या यांनीही राहुल याच्या व्हॉलिबॉलमधील भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com