Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची ठिणगी आता गोव्यात; पाठिंबा वाढल्याने केंद्र सरकारवरील राजकीय दबाव अधिक तीव्र

Sonam Wangchuk Hunger Strike: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सनम्वयक अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी आज वांगचुक यांची भेट घेऊन समर्थन दिले.
Sonam Wangchuk Hunger Strike
Sonam WangchukDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकाराबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर १९ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा वाढला आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सनम्वयक अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी आज वांगचुक यांची भेट घेऊन समर्थन दिले. तर, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे वांगचूक यांच्या समर्थनार्थ २० जुलैला दिल्लीत येणार आहेत.

Sonam Wangchuk Hunger Strike
NEET Exam: 'नीट' पेपरफुटीविरोधात 'टुगेदर फॉर म्हापसा' रस्त्यावर; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

वांगचुक समर्थनार्थ ‘आप’ मैदानात

दिल्लीत आमरण उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ‘आप’च्या नेत्यांनी गुरुवारी पणजीतील आझाद मैदानावर येऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाने केली. त्याचप्रमाणे राज्यातील कलाकार,बुद्धिजीवी वांगचुक यांना पाठबळ देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com