Tamil Nadu Heavy Rainfall: तामिळनाडूत पावसामुळे हाहाकार… 800 प्रवाशांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरु

Tamil Nadu Heavy Rainfall: मिचॉन्गनंतर आता तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Tamil Nadu Heavy Rainfall
Tamil Nadu Heavy RainfallDainik Gomantak

Tamil Nadu Heavy Rainfall: मिचॉन्गनंतर आता तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. थुथुकुडी आणि तिरुचेंदूरजवळील श्रीवैकुंटममध्ये पुरामुळे सुमारे 800 प्रवासी अडकले आहेत. पूरग्रस्त भागात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नानंतर एका मुलासह अनेक प्रवाशांना तेथून बाहेर काढून हेलिकॉप्टरमध्ये आणण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून खाद्यपदार्थांची पाकिटे टाकली जात आहेत. ज्याचे रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफचे जवान प्रवाशांमध्ये वाटप करत आहेत.

Tamil Nadu Heavy Rainfall
Tamil Nadu Crime News: इथं क्रूरताही ओशाळली... गर्लफ्रेंडला मारुन मृतदेहाचा फोटो ठेवला व्हॉट्सअप स्टेटस!

मदत आणि बचाव कार्य सुरुच आहे

मात्र, दक्षिण तामिळनाडूच्या बहुतांश भागात पाऊस जवळपास थांबला आहे. मात्र पुराच्या प्रभावामुळे लोकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे. एनडीआरएफ, हवाई दल, रेल्वे आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. काल काही प्रवासी श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर अडकले होते. त्यांनी ट्रेनच्या डब्यातच रात्र काढली.

Tamil Nadu Heavy Rainfall
Tamil Nadu Bus Accident: चेन्नई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार, 60 जखमी

स्टालिन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली

दिल्लीत उपस्थित असलेले मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सोमवारी रात्री तिरुनेलवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी येथील मंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांसह ऑनलाइन माध्यमातून बैठक घेतली आणि त्यांना बचाव कार्याला गती देण्यास सांगितले. दक्षिणेकडील जिल्ह्यांतील पुराचे पाणी बाहेर काढण्यासाठी चेन्नईहून अतिरिक्त पंप पाठवण्यात आले आहेत आणि बचाव कार्याचा भाग म्हणून सुमारे 200 बोटीही तैनात करण्यात आल्या आहेत.

चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला

तामिळनाडूमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद होत्या. तिरुनेलवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी या चार जिल्ह्यांमध्ये पावसामुळे परिस्थिती सर्वात जास्त बिघडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com