Tamil Nadu Bus Accident: चेन्नई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार, 60 जखमी

Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील तिरुपत्तूर येथे भीषण रस्ता अपघात झाला
Tamilnadu Bus Accident
Tamilnadu Bus AccidentDainik Gomantak

Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील तिरुपत्तूर येथे भीषण रस्ते अपघात झाला असून त्यात 5 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. चेन्नई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे दोन बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

दोन बसची टक्कर

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील (Tamil Nadu) चेन्नई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे ही घटना घडली. या अपघाताबाबत सांगण्यात येत आहे की, परिवहन महामंडळाची बस आणि ओम्नी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली.

एका पोलीस अधिकाऱ्याकडून वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची बस बंगळुरुहून चेन्नईला जात होती, ती अचानक वानियामबडीजवळ चेट्टियप्पनूर येथे एका खाजगी ओम्नी बसला धडकली.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात एका महिलेसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन्ही बसचालकांचाही समावेश आहे.

दोन्ही बस चालकांचा मृत्यू झाला

दरम्यान, 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जागीच मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुडुवनचेरी येथील रितिका (32), वानियांबडी येथील मोहम्मद फिरोज (37), एसईटीसी बस चालक एलुमलाई (47) आणि बी अजित (25 रा. चित्तूर), तर ओम्नी बस चालक एन सय्यद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Tamilnadu Bus Accident
Karnataka Bus Accident At Goa: चालकाला लागली डुलकी; कर्नाटकची बस आगशीत उलटली...

अपघात कसा झाला?

या अपघाताबाबत सांगितले जात आहे की, एसईटीसी बस दुभाजकाला धडकली, त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या ओम्नी बसला धडक दिली. दोन्ही बसची धडक एवढी जोरदार होती की, त्या बसचा चक्काचूर झाला.

अपघातात (Accident) जखमी झालेल्यांना तिरुपत्तूर जिल्ह्यातील वानियांबडी सरकारी रुग्णालयात आणि वेल्लोरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com