Tamil Nadu Crime News: इथं क्रूरताही ओशाळली... गर्लफ्रेंडला मारुन मृतदेहाचा फोटो ठेवला व्हॉट्सअप स्टेटस!

Tamil Nadu Crime News: तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमात पडलेल्या प्रियकराने एवढं मोठं पाऊल उचललं की या प्रकरणासंबंधी पोलीसही चक्रावले.
Crime news
Crime newsDainik Gomantak

Tamil Nadu Crime News: तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमात पडलेल्या प्रियकराने एवढं मोठं पाऊल उचललं की या प्रकरणासंबंधी पोलीसही चक्रावले. त्याने गर्लफ्रेंडची हत्या तर केलीच पण तिच्या मृतदेहाचा फोटोही आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट केला. त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला. सुरुवातीला पोलिसांना यावर विश्वास बसला नाही, पण सत्य समोर आल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. हे प्रकरण चेन्नई येथील आहे. एका तरुणाने हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडची गळा आवळून हत्या केली. तरुण 20 वर्षांचा होता आणि त्याची गर्लफ्रेंड देखील 20 वर्षांची होती.

दरम्यान, तरुणाच्या स्टेटसवर मृतदेहाचा फोटो पाहिल्यानंतर मृत तरुणीच्या मित्रांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला जवळच्या हॉटेलमधून अटक करुन तपास सुरु केला आहे. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. जवळपासचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, दोघेही पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी कोणालाही न सांगता लग्नही केले होते. हॉटेलमधून तरुणीचा मृतदेह सापडला आहे. ही तरुणी केरळमधील कोल्लमची रहिवासी होती. गुपचूप लग्न केल्यानंतर दोघांनाही एक मूल झाले, ज्याला त्यांनी दत्तक दिले होते.

Crime news
Tamil Nadu Bus Accident: चेन्नई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार, 60 जखमी

भांडणाचे कारण काय होते?

तरुणीने तरुणाच्या फोनमध्ये इतर महिलांचे फोटो पाहिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिला इतर महिलांच्या फोटोचे कारण जाणून घ्यायचे होते आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रियकराने तिला मारहाण करुन टी-शर्टने गळा आवळून खून केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com