India G20 Presidency
India G20 PresidencyDainik Gomantak

India G20 Presidency: भारताला G-20 अध्यक्षपद मिळाल्यावर अमेरिकेकडून आले मोठे वक्तव्य

आजपासून भारताने औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
Published on

भारताला आज औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद मिळाले आहे. पुढील एक वर्ष भारत या शक्तिशाली गटाचे नेतृत्व करणार आहे. पुढील एका वर्षात 50 हून अधिक ठिकाणी G-20 चे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. भारत सरकारनेही यासाठी तयारी सुरू केली आहे. G-20 चे अध्यक्षपद मिळाल्यावर सर्व देशांकडून भारतावर (India) अभिनंदनाचा वर्षाव होत असून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेनेही (America) भारताच्या अध्यक्षपदाला पाठिंबा देण्याचे बोलले आहे. व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका G-20 अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्यासाठी उत्साहित आहे. 

1 डिसेंबर म्हणजेच आजपासून औपचारिकपणे जगातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्थांच्या गटाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अमेरिका भारताला पाठिंबा देण्यासाठी उत्साहित आहे. व्हाईट हाऊसच्या (White House) प्रस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही एक मजबूत जागतिक अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवत असताना, सध्याच्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासह विविध मुद्द्यांवर पुढील वर्षी भारताच्या G20 साठी उत्सुक आहोत."

India G20 Presidency
Indo-US Military Exercise: भारताची चीनला खुन्नस; थेट LAC जवळ अमेरिकेसोबत युद्धसराव

पुढील वर्षी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भारत (India) दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "तुम्ही पाहिल्याप्रमाणे, राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात G-20 मध्ये भाग घेतला आहे. सध्या माझ्याकडे दौऱ्याबाबत काही माहिती नाही. 

  • पाकिस्तानबाबत केलेले विधान

    दरम्यान, बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी व्हाईट हाऊसने पाकिस्तानमधील नवीन लष्करप्रमुखांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले, अमेरिका इस्लामाबादसोबत काम करण्यास उत्सुक आहे. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांनी मंगळवारी औपचारिकपणे पाकिस्तानी लष्कराची कमान स्वीकारली. कॅरिन जीन-पियरे म्हणाले, "अमेरिकेला पाकिस्तानसोबतच्या आमच्या दीर्घकालीन सहकार्याची कदर आहे आणि असा विश्वास आहे की एक समृद्ध आणि लोकशाही पाकिस्तान अमेरिकन हितासाठी आवश्यक आहे." या प्रदेशासाठी स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com