Jal Shakti Ministry's Twitter Handle: जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक, सायबर तज्ञांचा तपास सुरु

Jal Shakti Ministry's Twitter Handle: अलीकडेच एम्स दिल्लीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला तेव्हा मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले.
Jal Shakti Ministry's Twitter Handle
Jal Shakti Ministry's Twitter HandleDainik Gomantak

हॅकर्सनी आज सकाळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर अकाउट हॅक केले. सुरक्षा एजन्सी आणि सायबर तज्ज्ञांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अलीकडेच एम्स दिल्लीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला तेव्हा मंत्रालयाचे ट्विटर (Twitter) हँडल हॅक करण्यात आले. पण, आता ट्विटर अकाऊंट पुर्ववत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जलशक्ती मंत्रालयाच्या खात्यातून क्रिप्टो वॉलेट सुई वॉलेटची जाहिरात करणारे ट्विट सर्वप्रथम सकाळी 5:38 वाजता पोस्ट करण्यात आले. अकाउंटचे प्रोफाइल फोटो बदलले होते.

  • संशयास्पद ट्विट काढून टाकले

मंत्रालयाच्या हँडलवरून मूळ ट्विटमध्ये अनेक अनोळखे अकाउंट देखील टॅग करण्यात आली होती आणि त्यानंतरच्या ट्विटमध्ये त्याच पद्धतीचे अनुसरण केले गेले. मात्र, काही वेळातच अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आणि संशयास्पद ट्विट काढून टाकण्यात आले. सुरक्षा एजन्सी आणि सायबर तज्ञ आता या घटनेचा तपास करत आहेत.

  • हॅकर्सनी 80 पेक्षा जास्त ट्विट केले

एका वृत्तानूसार हॅकर्सनी स्वच्छ भारत आणि इतर मंत्रालयांना टॅग करत अनेक ट्विट केले. पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये काही बॉट अकाउंट्स आणि काही रियल अकाउंट्स देखील टॅग केली गेली आहेत. हॅकर्सनी 80 हून अधिक ट्विट (Tweet) केले होते. काही ट्विटमध्ये पाकिस्तानी खाती टॅग केली आहेत आणि त्यात क्रिप्टो-आधारित ट्विटर खात्यांच्या लिंक्स आहेत.

मंत्रालयाने हॅकिंग हल्ल्याला दुजोरा दिला आहे. हॅकिंगवर औपचारिक विधान अद्याप प्रलंबित आहे. सर्व ट्विट्स डिलीट केले गेले आहेत, ज्यामुळे हे स्पष्ट होते की खाते पुनर्संचयित केले गेले आहे. आतापर्यंत कोणत्याही हॅकर ग्रुपने हॅकिंगची जबाबदारी घेतलेली नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (I&B) ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक झाले होते. हॅकर्सनी प्रोफाइलचे नाव बदलून 'एलन मस्क' असे केले आणि "ग्रेट जॉब" असे ट्विट केले. अकाउंट्स पूर्ववत करण्यात आल्याचे मंत्रालयाने नंतर स्पष्ट केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालया खाते हॅक होण्याच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांचे वैयक्तिक ट्विटर हँडलही हॅक करण्यात आले होते. खाते पुनर्संचयित करण्यापूर्वी क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे ट्विट शेअर केले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com