Viral Video: 'कायदे मैं चलो'! पार्किंग कर्मचाऱ्याची IPS वर दादागिरी, जादा शुल्क आकारणाऱ्याला अधिकाऱ्याचा हिसका

Parking: तिकिटावर छापलेल्या 53 रुपयांऐवजी 60 रुपये आकारल्याबद्दल स्वत:चा बचाव करत पार्किंग अटेंडंट कारमधील पुरुषांना म्हणतो 'कायदे मे रहो'. हे ऐकून गाडीतील व्यक्ती म्हणतो, 'ठीक है, कायदे मे रहेंगे.'
A parking attendant allegedly threatened an IPS officer. He then charged Rs 60 for a parking ticket of Rs 53, telling the officer 'Kaide Me Chalo'.
A parking attendant allegedly threatened an IPS officer. He then charged Rs 60 for a parking ticket of Rs 53, telling the officer 'Kaide Me Chalo'.
Published on
Updated on

A parking attendant allegedly threatened an IPS officer. He then charged Rs 60 for a parking ticket of Rs 53, telling the officer 'Kaide Me Chalo':

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पार्किंग कर्मचाऱ्याने सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या एका IPS अधिकाऱ्याला धमकावण्याचा प्रकार केला आहे. पुढे या कर्मचाऱ्याने आयपीएस अधिकाऱ्याला 'कायदे मी चलो' म्हणत त्याच्याकडून 53 रुपयांच्या पार्किंग तिकिटासाठी 60 रुपये आकारले. पुढे अधिकाऱ्याल नियमांचे पालन करण्याचा कर्मचाऱ्याने आग्रह धरला.

A parking attendant allegedly threatened an IPS officer. He then charged Rs 60 for a parking ticket of Rs 53, telling the officer 'Kaide Me Chalo'.
Viral Video: हॉलिवूड चित्रपटाला लाजवेल असे दृष्य, पाहा PM Modi यांनी उद्घाटन केलेल्या Sudarshan Setu चा नजारा

मयंक अरहट नावाच्या युजरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी लिहिले, 'आयपीएस अभिषेक वर्मा हे हापूर जिल्ह्याचे एसपी आहेत. आज ते ब्रजघाटावर खासगी कारमध्ये चालकाच्या शेजारी बसले बसले होते. पार्किंगची पावती 53 रुपये असताना पार्किंग कर्मचाऱ्याने 60 रुपये वसूल केले. पुढे कर्मचाऱ्याने आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत 'कायदे मी चलो'.

कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे, 'सध्या पार्किंग अटेंडंट पोलिसांच्या ताब्यात आहे'.

A parking attendant allegedly threatened an IPS officer. He then charged Rs 60 for a parking ticket of Rs 53, telling the officer 'Kaide Me Chalo'.
Viral Video: परीक्षा केंद्रांबाहेरचं जोडप्याचं खुल्लम खुल्ला प्रेम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; यूजर्स म्हणाले...

व्हायरल व्हिडिओमध्ये, कारमधील पुरुष पार्किंग अटेंडंटला शुल्काबद्दल विचारतात. पार्किंग कामगार त्यांना 60 रुपये असे सांगतो. त्यानंतर कारमधील पुरुष पार्किंग अटेंडंटला पैसे देतात.

गाडीतला एक व्यक्ती ड्रायव्हरला पावती बघायला सांगतो. ती पाहिल्यानंतर, त्यांच्या लक्षात आले की, पावती 53 रुपयांची आहे. त्यामुळे गाडीतील व्यक्ती 7 रुपये परत करण्याची विनंती करतो.

तिकिटावर छापलेल्या 53 रुपयांऐवजी 60 रुपये आकारल्याबद्दल स्वत:चा बचाव करत पार्किंग अटेंडंट कारमधील पुरुषांना म्हणतो 'कायदे मे रहो'. हे ऐकून गाडीतील व्यक्ती म्हणतो, 'ठीक है, कायदे मे रहेंगे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com