King Title Reveal: 'सौ देशों में बदनाम...' शाहरुख खानच्या वाढदिवशी 'किंग'चा दमदार लूक रिलीज; VIDEO तूफान व्हायरल

Shah Rukh Khan Birthday: बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षीचा त्याचा वाढदिवस अधिक खास ठरला आहे.
Shah Rukh Khan Birthday
King Title RevealDainik Gomantak
Published on
Updated on

Shah Rukh Khan Birthday: आज 2 नोव्हेंबर जगभर 'एसआरके डे' म्हणून साजरा केला जात आहे, कारण याच दिवशी बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षीचा त्याचा वाढदिवस अधिक खास ठरला आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्याच्या बहुप्रतिक्षित 'किंग' (KING) चित्रपटाचा टायटल रिव्हिल व्हिडिओ (Title Reveal Video) जारी केला आहे.

'किंग'ची पहिली झलक

रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'किंग' हा चित्रपट शाहरुख खानला (Shah Rukh Khan) अशा रुपात दर्शवणार आहे, जो प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. ही पहिली झलक जगभरातील चाहत्यांना थ्रिल करणारी आहे. 'जवान' आणि 'पठाण' चित्रपटांमधील जोश कायम ठेवत, शाहरुख खान पुन्हा एकदा दमदार ॲक्शन अवतारात या चित्रपटात दिसणार आहे. समोर आलेली ही पहिली झलक सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे.

Shah Rukh Khan Birthday
Video: AI ची कमाल! शाहरुख, दीपिका अन् सलमानसह 'या' बॉलिवूड सेलिब्रेटींचा व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हीही म्हणाल...

शाहरुखचा इंटेन्स लूक

'किंग' हा एक स्टायलिश आणि जबरदस्त ॲक्शन एंटरटेनर चित्रपट असून, तो स्टाइल, करिष्मा आणि थ्रिल एका नवीन स्तरावर घेऊन जाईल. सिद्धार्थ आनंद यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात आहे, जो त्यांच्या ॲक्शन स्टोरीटेलिंगला नव्या उंचीवर नेणार आहे. शाहरुख खानच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, तो पूर्णपणे ग्रे हेअर मध्ये दिसत आहे. कानात बाळी, नाकातून वाहणारे रक्त (Bleeding Nose) आणि ओठात दाबलेला डावाचा पत्ता (Playing Card) अशा लूकमुळे त्याचा अवतार अधिकच इंटेन्स आणि रहस्यमय वाटत आहे.

Shah Rukh Khan Birthday
आर. माधवनने केले शाहरुख खानबाबत मोठे वक्तव्य! म्हणाला की, त्याच्यासारखा अभिनेता...

सिद्धार्थ आनंदकडून चाहत्यांना भेट

'किंग'चे टायटल रिव्हिल करणे हे शाहरुख खानच्या शानदार ओळखीचे सेलिब्रेशन आहे आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्याकडून चाहत्यांसाठी ही एक खास भेट आहे. हे टायटल रिव्हिल शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) रिलीज करण्यात आले, जिथे आपण पाहतो की ज्या व्यक्तीला सगळे 'किंग खान' म्हणतात, तो आता त्याच नावाच्या भूमिकेत, पण अत्यंत दमदार आणि उत्साही अंदाजात दिसत आहे. हा असा एक 'किंग' आहे, ज्याचे नाव केवळ भीती नव्हे, तर दहशत पसरवते. व्हिडिओच्या शेवटी शाहरुखचा डायलॉग आहे: "सौ देशों में बदनाम, दुनिया ने दिया सिर्फ एक ही नाम 'किंग'।"

Shah Rukh Khan Birthday
Shahrukh Khan: शाहरुख अन् जावेद जाफरीच्या मुलीचे एकत्र फोटो पाहून नेटकरी म्हणाले- 'किंग खानचे नियम...'

हा टायटल रिव्हिल व्हिडिओ चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी असून यामुळे 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com