Sameer Panditrao
नुकत्याच एका मुलाखतीत आर माधवन रोमँटिक सिनेमांबद्दल बोलत होता.
आर माधवन स्वतः अष्टपैलू अभिनेता आहे.
या मुलाखतीत त्याने रोमँटिक सिनेमांबद्दल अनेक विषयांवर भाष्य केले.
यावेळी तो म्हणाला की चांगल्या प्रेमकथा लिहिल्या जात नाहीत.
रोमँटिक कथांसाठी योग्य वयाच्या नायिका निवडणे गरजेचे आहे असेही तो म्हणाला.
पुढे त्याने शाहरुख खानचे भरभरून कौतुक केले.
तो म्हणाला की शाहरुख खानसारखा रोमान्स सिनेमात कुणीच करू शकत नाही.