
Viral Video: जिथे जिथे लोकांना काही विचित्र किंवा अनोखे दिसते तिथे ते लगेचच त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड करतात. यानंतर, ते जास्त काही न करता तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. यानंतर सर्व काम सोशल मीडिया यूजर्स बरोबर करतात. यातही बॉलिवूड कलाकारांचे व्हिडिओ, पोस्ट तर इतक्या वेगाने व्हायरल होतात की विचारायला नको.
शाहरुख, सलमान, रणबीर, आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या यांच्याबाबतीत काही असेल तर त्यांचे चाहते आणि इतर लोकही आवडीने त्यांचे व्हिडिओ, पोस्ट आणि रिल्स व्हायरल करुन आपल्या प्रतिक्रियाही देतात. सध्या या बॉलिवूड कलाकारांचे एआय जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये बॉलिवूड (Bollywood) कलाकार लहाणपणी कसे दिसत असतील हे दाखवण्यात आले आहे. लहानपणी शाळेतील क्लासमेट म्हणून त्यांना दाखवण्यात आले आहे. सलमान, शाहरुख रणबीर, आलिया, ऐश्वर्या, प्रिती झिंटा, ऋतिक रोशन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्संना चांगलाच आवडत आहे. लहानपणीचं प्रेम आणि त्याची भावना या व्हिडिओमधून दाखवण्यात आली. विशेष म्हणजे, व्हिडिओ सुरु होताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या आवाजातील गाणे सुरु होते, ज्यामुळे अगदी तुम्ही-आम्हीही काही क्षणासाठी व्हिडिओ पाहून दंगून जातो.
तसेच, दुसऱ्या व्हिडिओ हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभिषेक-ऐश्वर्या, विकी- कॅटरिना, निक जॉनस-प्रियकां चोप्रा, विराट- अनुष्का आणि सलमान दिसत आहेत. लहानपणी हे कपल कसे दिसत असतील हे यामधून दिसते. व्हि़डिओमध्ये सलमान अगदी एका कोपऱ्यात बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ सुरु होतो तेव्हा प्रसिद्ध वेबसीरिज 'पंचायत'चे गाणे सुरु होते.
शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या व्हिडिओमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, दंगल फेम आमिर खान, बेबो म्हणजे करिना कपूर, प्रिती झिंटा आणि इतर काही प्रसिद्ध कलाकार दिसत आहेत. पहिले दोन व्हिडिओ काही बॉलिवूड कलाकारांच्या लहानपणीचा होते, पण आताचा हा व्हिडिओ वर नामोउल्लेख केलेले कलाकार एका विशिष्ट वयानंतर कसे दिसत असतील यासंबंधीचा आहे. व्हिडिओमध्ये आलिया भट-कपूर मासे विकताना दिसत आहे. बिग बी पॉपकॉन विकताना, आमिर खान फळे विकताना आणि प्रिती झिंटा फुले विकताना दिसत आहे. तर बिचारी करिना कपूर पाण्यासाठी हातात घागर घेऊन थांबलेली दिसत आहे.
तुम्ही आत्ताच पाहिलेले हे व्हिडिओ व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, व्हिडिओ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंटही करत आहेत. तर काहीजण इमोजीद्वारे आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.