'ना ईडीचा छापा, ना आसामचे मुख्यमंत्री' जयराम रमेश यांनी बिहारी राजकारणाची महाराष्ट्राशी केली तुलना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बिहारमधील राजकीय बदलांची तुलना महाराष्ट्राशी केली आहे.
Jairam Ramesh
Jairam RameshDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी बिहारमधील राजकीय बदलांची तुलना महाराष्ट्राशी केली आहे. दोन्ही राज्यांच्या राजकीय स्थितीबाबत त्यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) निशाणा साधला आहे. यावेळी रमेश म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपने फक्त पक्षांतराचे काम केले. तर, बिहारमध्ये भाजपला नाकारण्यात आले आणि बेदखल करण्यात आले. मंगळवारी नितीशकुमार यांनी एनडीएमधून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. (Senior Congress leader Jairam Ramesh has compared the political changes in Bihar to Maharashtra)

Jairam Ramesh
Coronavirus: प्रियांका गांधी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

काँग्रेस नेत्याने ट्विट केले की, 'बिहारमध्ये ऑपरेशन लोटस झाले नाही, रोख रक्कम पकडली नाही, ईडीचा छापा पडला नाही. आसामचे मुख्यमंत्री नव्हते, रिसॉर्टला भेट दिली नाही. सर्व काही बिहार शैलीत कमी खर्चात आणि सभ्य पद्धतीने पार पडले आहे. मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा पक्ष आणि इतरांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्रात भाजपने पक्षांतराचे काम केले आहे. बिहारमध्ये भाजपला नाकारले गेले आणि बेदखल करण्यात आले आहे.

बिहारमध्ये काय झाले?

बिहारमध्ये जेडीयूचे दिग्गज नेते आरसीपी सिंह यांच्या निरोपानंतर राजकीय खळबळ उडाली आहे आणि भाजप आपला पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितीश यांनी केला होता. त्यांनी मंगळवारी पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती तसेच बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदनेही महाआघाडीच्या बैठकीला सुरुवात केली आहे.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदारांनी नितीशकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यानंतर नितीश यांनी दुपारी चार वाजता राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली.

महाराष्ट्रातकाय घडलं, एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे आमदार सुरत आणि गुवाहाटीला रवाना झाले, त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. येथे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला, आणि पुढे शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. सुमारे 40 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मंगळवारीच महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com