Minor Girl Harassment: केस ओढले, थोबाडीत मारली, शिवीगाळ केली! जमुईनंतर आता समस्तीपुरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड; भामट्यांचा व्हिडिओ व्हायरल

Bihar Minor Girl Harassment Viral Video: बिहारमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि गैरवर्तणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, जमुई प्रकरणापाठोपाठ आता समस्तीपुर जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला.
Bihar Minor Girl Harassment Viral Video
Minor Girl HarassmentDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar Minor Girl Harassment Viral Video: बिहारमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि गैरवर्तणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, जमुई प्रकरणापाठोपाठ आता समस्तीपुर जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला. समस्तीपुर जिल्ह्यातील कर्पूरीमध्ये एका मित्रासोबत जगतसिंहपुर बांधावर आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत काही भामट्यांनी गैरवर्तन करत धिंगाणा घातल्याची घटना घडली. आरोपींनी त्या जोडप्याला बेदम मारहाण करुन तेथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नव्हे तर मुलीशी (Girl) धक्काबुक्की आणि ओढाओढ करत तिच्यासोबत विनयभंगाचा प्रयत्न केला. या लाजिरवाण्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तात्काळ आरोपींच्या शोधासाठी धडक मोहीम राबवली.

Bihar Minor Girl Harassment Viral Video
Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत समस्तीपुरचे एसपी अरविंद प्रताप सिंह यांनी घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, 23 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेतील सर्व आरोपींची ओळख पटवण्यात आली असून व्हिडिओ समोर येताच तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपींच्या ठिकाणांवर पोलीस पथकाकडून छापे टाकले जात आहेत. लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करुन त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Bihar Minor Girl Harassment Viral Video
Bihar Crime: दोन बायका अन्...! बिहारमध्ये दोन पत्नींनी मिळून केली पतीची हत्या

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत जगतसिंहपुर बांधावर फिरण्यासाठी आली होती. त्यांनी आपली बाईक तिथे उभी केल्यावर काही तरुण तिथे गोळा झाले आणि त्यांनी त्यांना विनाकारण घेरले. हुल्लडबाज मुलांनी दोघांना जाब विचारण्यास सुरुवात केली आणि काही कळण्याच्या आतच मुलीशी असभ्य वर्तन करु लागले. आरोपींनी त्या मुलीचे केस आणि मान पकडून तिच्यासोबत जबरदस्तीने धक्काबुक्की केली. सोबत असलेल्या मित्राने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. मात्र, त्या मुलीने या भामट्यांच्या कृत्याला एकटीने जोरदार विरोध केला, तरीही आरोपींनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तिच्याशी अभद्र भाषा वापरली.

Bihar Minor Girl Harassment Viral Video
Bihar Crime: जवानाने पत्नीसह दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला जिवंत जाळले, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जमुईमध्येही अशीच एक लाजीरवाणी घटना घडली, जिथे कोचिंग सुटल्यानंतर 10 वीची एक विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत फिरत असताना काही मुलांनी त्यांना घेरले. जमुईचे एसपी विश्वजीत दयाल यांनी सांगितले होते की, आरोपींनी त्या मुलीला बळजबरीने उचलून नेण्याचा कुप्रयत्न केला, परंतु स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले असून, विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरुन सरकारला धारेवर धरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com