Salman Khan Terrorist: बॉलिवूडचा 'टायगर' पाकिस्तानसाठी 'दहशतवादी', भाईजानच्या बलुचिस्तान विधानावरून पाकड्यांना झोंबली मिर्ची

Salman Khan Declared Terrorist By Pakistan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने सौदी अरेबियामध्ये आयोजित जॉय फोरम २०२५ कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Salman Khan Terrorist
Salman Khan TerroristDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने सौदी अरेबियामध्ये आयोजित जॉय फोरम २०२५ कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सलमानने बलुचिस्तानसंदर्भात केलेले विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्याच्याविरुद्ध पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सलमान खानने आपल्या विधानात बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून वेगळा करत केला. त्यांनी म्हटले, “बलुचिस्तानचे लोक, अफगाणिस्तानचे लोक आणि पाकिस्तानचे लोक येथे आहेत; सौदी अरेबियामध्ये सर्वजण कठोर परिश्रम करत आहेत.” या विधानामुळे पाकिस्तानमध्ये संताप निर्माण झाला असून, सलमानच्या विधानाची अनेकत्र टीका केली जात होती.

बलुचिस्तानचे लोक अनेक दशकांपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि त्यासाठी सतत लढत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणात पाठिंबा मिळत असताना, भारताकडूनही काही वेळा बलुचिस्तानचा उल्लेख समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाल किल्ल्यावर भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला होता.

Salman Khan Terrorist
Goa Police Suspended: मद्यधुंद तरुणाला बेड्या घातल्या, पोलीस स्थानकात केली बेदम मारहाण; उपनिरीक्षक सेवेतून निलंबित

सौदी अरेबियातील बलुच नेत्यांनी सलमान खानच्या विधानाचे स्वागत केले, तर काही बलुच नेत्यांनी या विधानाला ऐतिहासिक मानले. एका नेत्याने म्हटले, “सलमान खानने असे काही केले आहे जे मोठे देशही करू शकत नाहीत.”

पाकिस्तान सरकारने सलमान खानच्या विधानाला गांभीर्याने घेतले असून, दहशतवाद विरोधी कायदा (१९९७) च्या चौथ्या अनुसूचीत सलमानचे नाव समाविष्ट केले आहे. सोशल मीडियावर अधिकृत यादी व्हायरल झाली आहे, ज्यात सलमान खानचा मुंबईतील पत्ता आणि स्वतंत्र बलुचिस्तानवरील विधानाचा संदर्भ दिला आहे.

सलमान खानच्या विधानानुसार, जर एखादा हिंदी चित्रपट सौदी अरेबियात प्रदर्शित झाला तर तो सुपरहिट होईल. तसेच, तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटही येथे शेकडो कोटींचा व्यवसाय करू शकतात. सलमानने बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील लोकांचे उल्लेख करत सांगितले की सौदी अरेबियातील कामगार येथे कठोर परिश्रम करत आहेत.

Salman Khan Terrorist
Goa Opinion: गोव्यात विरोधकांची ऐक्याची घोषणा ही केवळ 'आभासी' नाहीय काय?

सध्या हे स्पष्ट नाही की सलमान खानने जानून किंवा अनवधानाने बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे केले आहे की नाही. तथापि, त्यांच्या विधानानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेची लाट सुरू झाली आहे आणि पाकिस्तानमध्ये या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com