IND vs AUS: रोहित, विराट कोहलीचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा? पॅट कमिंसने व्यक्त केला अंदाज

IND vs AUS Tour : क्रिकेट विश्वातील दोन सुपरस्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा कदाचित हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल.
IND vs AUS
IND vs AUSDainik Gomantak
Published on
Updated on

सिडनी: क्रिकेट विश्वातील दोन सुपरस्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा कदाचित हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. त्यामुळे या दोन महान खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना अखेरची संधी असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने व्यक्त केले आहे.

व्हाइट बॉल सामन्यांच्या मालिकेतील एकदिवसीय मालिका येत्या रविवारपासून सुरू होत आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस या मालिकेत खेळणार नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या १५ वर्षांत ऑस्ट्रेलियातील भारताच्या जवळपास प्रत्येक दौऱ्याचे घटक राहिले आहेत. आता त्यांची कारकीर्द उतरणीला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांसाठी या दोघांचा प्रत्यक्ष खेळ पाहण्याची ही अखेरची संधी असू शकेल, असे कमिंसने सांगितले.

IND vs AUS
Tiger Reserve Goa: समिती करणार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पाहणी, गुरूवारी सचिवालयात होणार संबंधित घटकांशी चर्चा

विराट आणि रोहित निश्चितच भारताचे चॅम्पियन खेळाडू आहेत. त्यांचा चाहतावर्गही फार मोठा आहे. ते जेव्हा जेव्हा मैदानात असतात, तेव्हा त्यांच्या पाठीमागे सर्व प्रेक्षक असतात, असे कमिंस म्हणाला. या दोघांविरुद्ध खेळायला मला आवडले असते, परंतु तंदुरुस्त नसल्यामुळे मी खेळू शकणार नाही, याचे दुःख आहे. रोहित आणि विराटची ही कदाचित ऑस्ट्रेलियातील अखेरची मालिका असू शकेल. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकेल, असे कमिंसने सांगितले.

कमिंसच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. याच ऑस्ट्रेलिया संघाने २०२३ मधील विश्वकरंडक अंतिम सामन्यात भारताला हरवले होते. ऑस्ट्रेलियातील ही मालिका चुरशीची होईल, असा अंदाज कमिंसने व्यक्त केला.

भारतीय संघ रवाना

विराट कोहली आणि रोहित शर्मासह काही खेळाडू आज पहाटे ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आणि दुपारपर्यंत ते पर्थ येथे दाखल झाले. या पहिल्या जत्थ्यामध्ये रोहित-विराटसह कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि प्रसिध कृष्णा तसेच सपोर्ट स्टाफ यांचा समावेश होता. मुख्य प्रशिक्षक तसेच उर्वरित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्य बुधवारी सायंकाळी रवाना झाले.

IND vs AUS
Goa AAP Candidates : सासष्टीत 9 मतदारसंघांत ‘आप’ देणार उमेदवार! काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी; गोवा फॉरवर्डही रिंगणात

रोहित आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय प्रकारातील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका या दोघांसाठी अखेरची कसोटी ठरली होती. त्यानंतर त्यांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com