Rohit Sharma: वनडे रिटायरमेंटच्या चर्चेला पूर्णविराम! रोहित शर्मानं VIDEO शेअर करत दिलं मोठं अपडेट
भारतीय संघ सध्या आशिया कप 2025 मध्ये व्यस्त असून, हा स्पर्धा यंदा टी20 स्वरूपात रंगतदार पद्धतीने पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे चाहते येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आणि या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मैदानाबाहेर असलेला दिग्गज फलंदाज विराट कोहली.
अलिकडच्या काळात रोहित शर्मा एकदिवसीय स्वरूपातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांना स्वतः रोहितने पूर्णविराम दिला आहे. रोहितने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यात तो नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणे निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर 2025 रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसेल, अशी जवळपास खात्री आहे. दुसरीकडे, भारतात सध्या असलेला ऑस्ट्रेलिया अ संघ दोन अनधिकृत कसोटी सामने खेळणार असून त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळेल.
रोहित शर्माने बराच काळ एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नसल्यामुळे ही मालिका त्याच्यासाठी स्वतःच्या तयारीची एक उत्तम चाचणी ठरेल. याआधी रोहितने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
त्यानंतर, 7 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत त्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष रोहितच्या एकदिवसीय पुनरागमनावर आणि त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या कामगिरीवर लागलेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.