Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

Rohit Sharma Record in ICC ODI Rankings: रोहितने आता क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 2006 पासून अबाधित असलेला एक विक्रम मोडीत काढला.
Rohit Sharma Record
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Record in ICC ODI Rankings: काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने केलेल्या दमदार कामगिरीमुळे वातावरण पूर्णपणे बदलले. याच कामगिरीच्या जोरावर रोहितने आता क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 2006 पासून अबाधित असलेला एक विक्रम मोडीत काढला. हा कीर्तिमान आयसीसी (ICC) क्रमवारीशी संबंधित आहे.

आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित शर्मा नंबर-1

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका संपल्यानंतर आयसीसीने वनडे (ODI) क्रिकेटची नवीन क्रमवारी जाहीर केली. या मालिकेत टीम इंडिया पहिले दोन सामने हरुन मालिका गमावली असली तरी, फलंदाजांच्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर रोहित शर्माने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिले स्थान पटकावले.

रोहित शर्मासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे, कारण तो त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच या क्रमवारीत नंबर-1 च्या खुर्चीवर विराजमान झाला आहे. यापूर्वी, तो दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचला होता, पण पहिल्या स्थानावर पोहोचू शकला नव्हता. यावेळी मात्र त्याने कोणतीही चूक न करता अव्वल स्थान पटकावले.

Rohit Sharma Record
Rohit Sharma Viral Post: 'अलविदा...' रोहित शर्माची पोस्ट व्हायरल! 'मुंबईचा राजा' घेणार निवृत्ती? चाहते चिंतेत

सध्या रोहित शर्माची रेटिंग 781 आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानची रेटिंग 764 आहे. या दोघांमध्ये चांगले अंतर असल्याने, रोहित लवकर ही खुर्ची सोडणार नाही, असे मानले जात आहे.

सर्वात वयस्कर नंबर-1 फलंदाज

रोहित शर्माने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू होण्याचा विक्रम केला. यापूर्वी, हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. रोहितने 38 वर्षे आणि 182 दिवसांचा असताना वनडे क्रमवारीत पहिले स्थान पटकावले, तर सचिन तेंडुलकरने 2011 मध्ये जेव्हा 38 वर्षे आणि 73 दिवसांचा होता, तेव्हा टेस्ट (Test) क्रमवारीत नंबर-1 चा मान मिळवला होता. अशा प्रकारे, रोहित शर्माने सचिनचा 11 वर्षांहून अधिक जुना विक्रम मोडला.

Rohit Sharma Record
Rohit Sharma: 'मी आणि विराट पुन्हा खेळायला येईन याची खात्री नाही'! रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे खळबळ; प्रेक्षकांचे मानले आभार

2019 मध्ये हुकले होते अव्वल स्थान

2019 मध्ये वनडे विश्वचषक सुरु असताना रोहित शर्माने अनेक शतके झळकावली होती. त्यावेळी त्याची आयसीसी वनडे रेटिंग 882 पर्यंत पोहोचली होती. इतकी जबरदस्त रेटिंग असतानाही त्याला पहिल्या क्रमांकावर पोहोचता आले नव्हते, पण आता 781 रेटिंगसह तो अव्वल स्थानी आहे. या विक्रमामुळे रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला मोठे बळ मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com