Rohit Sharma Viral Post: 'अलविदा...' रोहित शर्माची पोस्ट व्हायरल! 'मुंबईचा राजा' घेणार निवृत्ती? चाहते चिंतेत

Rohit Sharma Post: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका अखेर संपली असून, या मालिकेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा.
Rohit Sharma Viral Post
Rohit Sharma Viral PostDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका अखेर संपली असून, या मालिकेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा. मालिकेदरम्यान विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असले तरी, रोहितने आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. तीन सामन्यांच्या मालिकेत २०० पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज ठरला. या मालिकेनंतर रोहित शर्मा आता ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा मैदानात उतरणार आहे.

तथापि, ऑस्ट्रेलियाहून परतण्यापूर्वी रोहित शर्माने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सिडनी विमानतळावरून निरोप घेतानाचा त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्याच्या कॅप्शनमुळे चर्चेला उधाण आले आहे.

रोहितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “शेवटची वेळ, सिडनीहून निरोप.” या वाक्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे की, रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये कदाचित शेवटचा सामना खेळला आहे का? काहींनी याचा अर्थ निवृत्तीच्या संकेतांप्रमाणे घेतला, तर काहींनी हे फक्त भावनिक निरोप मानले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माची कामगिरी अत्यंत प्रभावी ठरली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो फक्त ८ धावांवर बाद झाला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने अॅडलेडच्या मैदानावर दमदार पुनरागमन करत ७३ धावा झळकावल्या.

तिसऱ्या सामन्यात तर हिटमॅनने आपल्या नावाला साजेशी १२१ धावांची नाबाद खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण मालिकेत त्याने एकूण २०२ धावा केल्या, स्ट्राईक रेट होता ८५.५९.

त्याच्या संयमी आणि जबाबदार फलंदाजीसाठी रोहित शर्माला तिसऱ्या सामन्यात “सामनावीर” तर संपूर्ण मालिकेत “मालिकावीर” म्हणून गौरवण्यात आले. त्याच्या या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, जेव्हा रोहितचा बॅट बोलतो, तेव्हा विरोधकांची बोलती बंद होते. आता सर्वांच्या नजरा त्याच्या आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेतील कामगिरीकडे लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com